मेलबर्न। भारताने रविवारी(३० डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात १३७ धावांनी विजय मिळवला आहे. याबरोबरच चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.
हा सामना संपल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने भारताच्या विजयाचे श्रेय प्रथम श्रेणी क्रिकेटला देत कोणाचेही नाव न घेता भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटवर प्रश्न उभा करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
विराट म्हणाला, ‘आमचे प्रथम श्रेणी क्रिकेट उत्कृष्ट आहे. त्यामुळेच आम्ही जिंकलो. याचे सर्व श्रेय भारतातील प्रथम श्रेणी क्रिकेटच्या रचनेला जाते. जिथे आमच्या वेगवान गोलंदाजांना आव्हाने मिळतात ज्याची मदत परदेशात खेळताना होते.’
https://twitter.com/7Cricket/status/1079206605659332608
विराट बरोबरच या सामन्यात ८६ धावांत ९ विकेट घेत सामनावीर ठरलेल्या जसप्रीत बुमराहनेही भारतातील प्रथम श्रेणी क्रिकेटला त्याच्या यशाचे श्रेय दिले आहे.
https://twitter.com/bhogleharsha/status/1079208591834308609
या सामन्याच्या पहिल्या दिवशी (२६ डिसेंबर) मयंक अगरवाल फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू केरी कीफ यांनी त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच अगवालने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केलेली खेळी कॅटींनमधील कर्मचाऱ्यांच्या किंवा हाॅटेमध्ये काम करणाऱ्या वेटरसोबत केली असल्याचे त्यांनी भाष्य केले होते.
तसेच केरी कीफ बरोबरच समालोचन कक्षात आलेल्या मार्क वाॅनेही मयंकवर अतिशय खराब टीपण्णी केली होती. त्याची प्रथम श्रेणीमधील सरासरी भारतात ५० आहे. जी ऑस्ट्रेलियाचा विचार करता जेमतेम ४० आहे, असे यावेळी मार्क वाॅ म्हणाला होता.
या टीकेनंतरही अगरवालने पहिल्या डावत ७६ आणि दुसऱ्या डावात ४२ धावांची खेळी करत त्याच्यातील प्रतिभेची चूणूक दाखवली आहे.
मयंकच्या पहिल्या डावातील अर्धशतकी खेळीनंतर फॉक्स क्रिकेटसाठी समालोचन करत असलेले केरी कीफ यांनी माफी मागतली असून त्यांनी म्हटले आहे की ‘मी अगरवालच्या भारतात केलेल्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या धावांबद्दल बोलत होतो. ज्यावर या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.’
‘मी कोणत्याही प्रकारे त्याच्या स्थराला कमी मानत नाही. त्याने बऱ्याच धावा केल्या आहेत. त्यामुळे कोणालाही वाईट वाटले असेल तर मी माफी मागतो.’
त्याचबरोबर वॉ यांनीही त्यांनी केलेल्या टीकेबद्दल स्पष्टीकरण देताना ट्विट केले आहे की ‘मी म्हणालो प्रथम श्रेणीमधील सरासरी भारतात ५० आहे. जी ऑस्ट्रेलियाचा विचार करता जेमतेम ४० आहे. कारण अनेक खेळाडूंनी ती सरासरी गाठली आहे. पण अगरवाल त्याच्या पहिल्याच डावात चांगली खेळी केली.’
https://twitter.com/juniorwaugh349/status/1077785336065867776
केरी कीफ यांच्यावर भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–कमी सामन्यात कर्णधार राहुन कोहली विक्रमांत धोनी- गांगुलीच्या पुढे
–बुमराह पॅटर्न लईच वाईट, आफ्रिका, इंग्लड आणि आता ऑस्ट्रेलिया, कुणालाच समजला नाही
–बुमराह एक, पराक्रम अनेक- भारताच्या या शिलेदाराचे भीमपराक्रम पहाच