---Advertisement---

विराट कोहलीच्या लाडक्या लेकीचे लंडनमध्ये झाले खास स्वागत, पाहा फोटो

On: मंगळवार, ऑगस्ट 10, 2021 4:01 PM
Virat Kohli and Anushka Sharma with daughter Vamika
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबत लंडनमध्ये आहेत. त्याचबरोबर ते सोशल मीडियावर लंडनमधील अनेक फोटो पोस्ट करत आहेत. आता अनुष्काने इंस्टाग्राम स्टोरीवर लंडनमधील तिच्या हॉटेलच्या खोलीची झलक शेअर केली आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये हिरवा फुगा दिसत आहे. त्यावर ‘वेलकम बॅक डिअर वामिका’असे लिहिलेले आहे.

विराट सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यास सध्या व्यस्त आहे. या मालिकेतील दुसरा सामना १२ ऑगस्टपासून लॉर्ड्सवर होणार आहे. त्याचसाठी संपूर्ण भारतीय संघ लंडनला पोहचला आहे. याचदरम्यानचा हॉटेलच्या खोलीतील फोटो अनुष्काने शेअर केला होता. ही मालिका सुरु होण्यापूर्वी आणि बीसीसीआयने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर दिलेल्या सुटीदरम्यान विराट आणि अनुष्का यांनी लंडनमध्ये काहीवेळ घालवला होता.

Photo Courtesy;: Instagram/AnushkaSharma

मागील काही दिवसांपासून विराट आणि अनुष्का यांनी लंडनमध्ये फिरत असतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्याच दरम्यान गेल्या महिन्यात कोहली आणि अनुष्काने त्यांच्या मुलीच्या जन्माला सहा महिने पूर्ण झाले होते. तेव्हा अनुष्काने याची माहिती फोटो शेअर करून दिली होती. याचदरम्यान ते सहलीला ही गेले होते. हे फोटो पोस्ट करताना अनुष्काने कॅप्शन लिहिले की, ‘तिच्या एका स्मित हास्याने आमचे संपूर्ण जग बदलते आहे.’

https://www.instagram.com/p/CRMebJkJptY/

अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने मागील काही दिवसांपासून रुपेरी पडद्यावरून ब्रेक घेतला आहे. ब्रेक घेण्याअगोदर तिचा शेवटचा चित्रपट झिरो हा होता. यामध्ये तिच्या सोबत शाहरुख खान आणि कतरिना कैफ हे देखील दिसून आले होते. त्यांनी त्यांच्या निर्मिती कंपनी क्लीन स्लेट फिल्म्सच्या माध्यमातून पाताल लोक आणि बुलबुल चित्रपटाची निर्मिती केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

अतिशय लाजिरवाणे! वेदनेनं भर मैदानात विव्हळत होता फलंदाज, बघून प्रतिस्पर्धींसह हसत होते पंचही

सिराजने वाढवली १०२ कसोटींचा अनुभव असलेल्या ‘या’ गोलंदाजाची डोकेदुखी, बसावं लागणार बाकावर!

पदकं खेळाडूंनी जिंकलीत की मोदींनी?; पुरस्कार सोहळ्यातील ‘त्या’ गोष्टीमुळे ऑलिंपिक विजेत्या खेळाडूची नाराजी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---