भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका रविवारी (15 जानेवारी) संपली. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना तिरुअनंतपुरम याठिकाणी खेळला गेला. या सामन्यात भातीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आणि स्वतःचे 74 वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. विराट कोहली, शुबमन गिल आणि मोहम्मद सिराज संघासाठी या सामन्यात मॅच विनर ठरले. सामना जिंकल्यानंतर विराटने माध्यमांना खास प्रतिक्रिया दिली.
विराट कोहली (Virat Kohli) श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्या शतक ठोकले होतो. त्यानंतर मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यातही त्याच्या बॅटमधून चाहत्यांना अजून एक वादळी शतक पाहायला मिळाले. रविवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात विराटने 110 चेंडूत नाबाद 166 धावा केल्या. यामध्ये 13 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश आहे. या खेळीनंतर विराटने त्याच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले. भारताने हा सामना विक्रमी 317 धावांच्या अंतराने जिंकला असून विराट सामनावीर ठरला.
विजयानंतर विराट कोहली म्हणाला, “माझ्यासाठी हे माझे ध्येय आणि मानसिकेचा विजय आहे, ज्याच्यासह मी नेहमी खेळत असतो. संघाला नेहमी विजयासाठी मदत करण्याची माजी मानसिकता असते. जितका अधिक वेळ फलंदाजी करता येईल, तितकी केली पाहिजे. जर हे शक्य झाले, तर सामन्यावर तुम्ही प्रभाव पाडू शकता. मोठी विश्रांती घेतल्यानंतर जेव्हापासून मी मैदानात पुनरागमन केले आहे, तेव्हापासून फलंदाजीचा आनंद घेत आहे. आजच्या खेळीनंतरही चांगले वाटत आहे. पुढेही अशा प्रकारे खेळता यावे अशी माजी इच्छा आहे.”
विराटने यावेळी मोहम्मद सिराजचे देखील कौतुक केले, ज्याने भारतासाठी सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. विराट म्हणाला, “ज्या पद्धतीने सिराज संघात आला, ते अप्रतिम आहे. त्याने पावरप्लेमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेतल्या आहेत, जे संघासाठी महत्वाचे होते. तो नेमहीच फलंदाजाला विचार करण्यासाठी भाग पाडतो. यावर्षी विश्वचषक खेळला जाणार आहे आणि माच्यासाठी हे चांगले संकेत आहेत.” (Virat Kohli’s special reaction after a innings of 166 runs)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महिला आयपीएलमुळे बीसीसीआय मालामाल, मीडिया राईट्ससाठी आघाडीच्या कंपनीने मोजले 951 कोटी
विराटला यशस्वी बनवण्यात ‘या’ तिघांचा मोलाचा वाटा; कोहलीही म्हणाला, ‘त्यांच्यामुळेच मी आज इथे…’