पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर नेहमीच त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. अख्तरने आता भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज विराट कोहली विषयी एक विधान केले, जे चांगलेच चर्चेत आहे. अख्तरच्या मते विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील केवळ दोन फॉरमॅटवर लक्ष्य केंद्रित केले पाहिजे.
मागच्या वर्षी आयसीसी टी-20 विश्वचषक खेळल्यानंतर विराट कोहली याने भारतासाठी एखही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाहीये. यादरम्यान त्याने वनडे आणि कसोटी सामने खेळले, पण टी-20 सामना मात्र खेळला नाही. त्याने नुकतेच काही दिवासंपूर्वी बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये जबरदस्त शतक ठोकले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात विरानटे 186 धावांची ताबडतोड खेळी केली होती.
अख्तर स्पोर्ट्स तकवर दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “एका क्रिकेटपटूच्या रूपात मला विचाराल, तर मला वाटते विराटने कोहलीने कसोटी आणि वनडे फॉरमॅटवर लक्ष दिले पाहिजे. टी-20 क्रिकेटमध्ये त्याची खूप उर्जा जात आहे. त्याला टी-20 क्रिकेट आवडते, पण काही वेळा तुम्हाला शरिराचा विचार देखील केला पाहिजे. तो सध्या 34 वर्षांचा आहे. अशात कमीत कमी 6 ते 8 वर्ष तो खेळू शकतो. जर त्याने 3.-35 कसोटी सामने अजून खेळले, तर या फॉरमॅटमध्ये अजून 25 शतके करू शकतो.”
अख्तर यावेळी विराटच्या मेंटल हेल्थविषयी देखील बोलला. “तो आपल्या मेंडल हेल्थवर कसे काम करतो, हे पाहणे महत्वाचे असेल. नशिबाने त्याचे व्यक्तिमत्व भक्कम आहे. तो एक पंजाबी आहे. त्याचे फ्रेम ऑफ माइंड अप्रतिम आहे. तो आपल्या फिटनेसवर लक्ष देत आहे.” दरम्यान, भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला विजय, तर दुसऱ्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. उभय संघांतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना बुधवारी (22 मार्च) खेळला जाईल. या सामन्यात विराटच्या प्रदर्शनावर चाहत्यांचे विशेष लक्ष असेल. (‘Virat should quit T20 format’, Shoaib Akhtar)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभूत होताच खचली कर्णधार स्मृती मंधाना; म्हणाली, ‘….आमचा संघ खराब आहे’
IPL Breaking। हंगाम सुरू होण्यापूर्वी पंजाबला लागली गळती, तडाखेबंद खेळाडूची माघार





