भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेचा (sa vs ind test series) तिसरा सामना सध्या सुरू आहे. हा सामना मंगळवारपासून (११ जानेवारी) केप टाऊनमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी कर्णधार विराट कोहली (virat kohli) याने अप्रतिम प्रदर्शन केल्यामुळे सर्वांकडून त्याचे कौतुक करण्यात आले. तर दुसऱ्या दिवशी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (mohammad shami) जबरदस्त गोलंदाजी केली. दरम्यान विराटने दुसऱ्या दिवशी शमीसाठी अशी काही कृती केली, ज्यामुळे सर्वांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले.
तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले. मोहम्मद शमीने एका षटकात दक्षिण अफ्रिकेच्या दोन विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी सामन्याच्या पहिल्या डावातील ५६ व्या षटकात जेव्हा गोलंदाजीसाठी आला, तेव्हा पहिल्या चेंडूवर त्याला चौकार मारला गेला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने दक्षिण अफ्रिकेचा टेम्बा बावूमाची विकेट घेतली. षटकातील तिसरा चेंडू निर्धाव गेला आणि चौथ्या चेंडूवर यष्टीरक्षक फलंदाज कायल व्हेरेन त्याच्या शून्य धावांवर विकेट गमावून बसला. शमीच्या या कामगिरीसाठी कर्णधार विराट कोहलीने भारतीय डगआऊटमधील खेळाडूंना प्रेत्साहन देण्यास सांगितले.
व्हिडिओ पाहा-
मोहम्मद शमीने या षटकातात दोन विकेट घेतल्यानंतर विराटने भारताच्या डगआऊटमध्ये बसलेल्या खेळाडूंना टाळ्या वाजवण्यास सांगितले. विराटकडून ही सुचना येताच खेळाडूही उत्साहात टाळ्या वाजवू लागले, पण त्यामध्ये एक वेगळेपणा पाहायला मिळाला. शाळेतील विद्यार्थ्यी ज्याप्रकारे टाळ्या वाजवतात, अगदी त्याचप्रकारे लयबद्ध टाळ्या खेळाडू वाजवताना दिसले. अशाच प्रकारच्या टाळ्या एनएसएस शाखेतील विद्यार्थी देखील वाजवतात. खेळाडूंची ही टाळ्या वाजवण्याची पद्धत पाहून चाहते देखील आश्चर्य व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Kohli celebrates the wickets.. looks towards his team dug out and shouts 'Keep Clapping Boys.. Keep Clapping' and this follows..
This guy just creates an amazing atmosphere in the match.. pic.twitter.com/ens77zqg3M
— Kanav Bali🏏 (@Concussion__Sub) January 12, 2022
दरम्यान, सामन्याच्या पहिला दिवस भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नावावर राहिला. विराटने पहिल्या दिवशी २०१ चेंडूत ७९ धावा केल्या, यामध्ये त्याच्या १२ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. पण दुसऱ्या बाजून त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही आणि भारताचा पहिला डावा २२३ धावांवर गुंडाळला गेला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण अफ्रिकेने एका विकेटच्या नुकसानावर आठ षटकांमध्ये १७ धावा केल्या.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी देखील चांगले प्रदर्शन दाखवले. दक्षिण अफ्रिकेचा संघ २१० धावांवर गारद झाला. यामध्ये मोहम्मद शमी दोन, उमेश यादव दोन आणि जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या –
चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन ऍव्हेंजर्सचा संघर्षपूर्ण विजय
‘हे’ ५ अनकॅप्ड खेळाडू आयपीएल २०२२ मध्ये करू शकतात पदार्पण, यादीत एक वेगवान गोलंदाजही सामील
व्हिडिओ पाहा –