युएई येथे आशिया चषक 2022 मधील सुपर फोर सामना खेळला गेला. भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने 101 धावांनी विजय साजरा केला. अनुभवी फलंदाज विराट कोहलीने झळकावलेले शतक भारतीय डावाचे वैशिष्ट्य राहिले. तब्बल 1020 दिवसांनी विराटने आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. त्याच्या या पहिल्यावहिल्या टी20 शतकानंतर भारताचे सर्वकालीन महान खेळाडू सुनील गावस्कर यांनी विराटबाबत एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
विराटने आपल्या या खेळी दरम्यान अवघ्या 61 चेंडूत 200 च्या स्ट्राईक रेटने 122 धावांची वादळी खेळी केली. यादरम्यान त्याने 12 चौकार आणि 6 षटकार मारले. शतक पूर्ण करण्यासाठी त्याला एकूण 53 चेंडू खेळावे लागले. याचबरोबर त्याचे हे 71 वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले. नोव्हेंबर 2019 नंतर प्रथमच त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक पूर्ण केले.
त्याच्या या शतकानंतर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर म्हणाले,
“ज्याच्या खात्यात 70 आंतरराष्ट्रीय शतके आहेत, त्याला आणखी एक शतक झळकावण्यात कोणतीही अडचण नव्हती. त्याला माहित आहे की तो किती सक्षम आहे. फक्त एक गोष्ट अशी आहे की, खेळाच्या या सर्वात छोट्या प्रकारात हे त्याचे पहिले शतक होते. टी20 क्रिकेटमध्ये त्याच्या खात्यात यापेक्षा जास्त शतके दिसली तर आश्चर्य वाटायला नको.”
गावसकर पुढे बोलताना म्हणाले,
“ज्या खेळाडूकडून सातत्याने शतक पाहण्याची अपेक्षा असते, मात्र जेव्हा तो खेळाडू शतक झळकावत नाही, तेव्हा लोकांना आश्चर्य वाटू लागते. यादरम्यान त्याने 50, 70 आणि 80 धावा केल्या. असे नाही की तो धावा काढत नव्हता, पण त्याला शतकही पूर्ण करता येत नव्हते.”
आता विराट पुन्हा एकदा भारतीय संघासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दिसेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडदौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला ड्रेसिंग रूममध्ये गाणी ऐकण्यास बंदी, वाचा संपूर्ण प्रकरण
विराटच्या शतकावर शास्त्री गुरूजींची खास शैलीत टिप्पणी! म्हणाले, ‘त्याचं किमान 5 किलो वजन…’