जेव्हा जेव्हा भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंचा विचार केला जातो, तेव्हा वीरेंद्र सेहवाग याचे नाव नक्कीच समोर येते. जेव्हा फलंदाज धावा करण्यापेक्षा विकेट वाचवण्याचा अधिक विचार करायचा, तेव्हा सेहवाग गोलंदाजांवर संकटे आणायचा. आजच्या परिस्थितीत संघाकडे रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवनसारखे अनेक सलामीवीर उपलब्ध आहेत. हे सर्वजण संघाला विस्फोटक सुरुवात देण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र भारतीय संघात विस्फोटक सुरुवात करण्याची प्रथा कोणी सुरू केली असेल, तर सेहवागचे नाव आघाडीवर येते.
सेहवागने (Virender Sehwag) २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, पण तरीही कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावा करता न आल्याचे दु:ख सेहवागच्या मनात घर करून आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान सेहवागने याचे स्पष्टीकरण दिले आहे.
वीरेंद्र सेहवागने सांगितले की, जर त्याला संघातून वगळले नसते, तर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० पेक्षा जास्त धावा केल्या असत्या. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सेहवाग पाचव्या क्रमांकावर आहे. भारतीय संघासाठी क्रिकेटच्या कसोटीमध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावसकर हे तीनच फलंदाज आहेत, ज्यांनी १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.
दरम्यान, २००१ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी पदार्पणात शतक झळकावल्यानंतर सेहवाग भारतीय संघाचा अविभाज्य भाग बनला, संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत. पण एका वाईट टप्प्याने त्याला कसोटी आणि एकदिवसीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवला. २००७ मध्ये ५२वी कसोटी खेळल्यानंतर सेहवागला पुढील कसोटी खेळण्यासाठी जवळपास एक वर्ष लागले.
या स्फोटक सलामीवीराने भारतासाठी १०४ कसोटी, २५१ एकदिवसीय आणि १९ टी२० सामने खेळले आहेत. ज्यात त्याने अनुक्रमे ८५८६, ८२७३ आणि ३९४ धावा केल्या आहेत. सेहवागने एका सामन्यात सर्वात जास्त कसोटीमध्ये ३१९, वनडेत २१९ तर टी२० मध्ये ६८ धावा बनवल्या आहेत. याशिवाय सर्वात जास्त वेळा चौकार मारत डावाची सुरुवात करण्यासारखे अनेक उल्लेखनीय रेकॉर्डस सेहवागच्या नावे आहेत.
हेही वाचा
“दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है”, मिलरच्या ट्वीटला राजस्थानचा भन्नाट रिप्लाय
गुजरातचा विजय किती खास? चेन्नईनंतर अशी संधी फक्त आता गुजरातच्या वाट्याला आलीये