कट्टर विरोधक असलेल्या भारत आणि पाकिस्तान संघातील क्रिकेटच्या मैदानावरील वादांविषयी आपण सगळ्यांनी ऐकलं आहे. त्यातही ‘नजफगडचा नवाब’ म्हणून प्रचलित असणारा विरेंद्र सेहवाग त्याच्या फलंदाजीसह शाब्दिक मारा करण्यातही तेवढाच तरबेज होता. असाच एक किस्सा घडला होता २००४ साली.
अख्तरने मुद्दाम काढली होती सेहवागची खोड
आज (२० ऑक्टोबर) ४२वा वाढदिवस साजरा करत असलेला सेहवाग गोलंदाजांच्या छोट्यात-छोट्या उणिवेचा फायदा घेत चेंडूला सीमारेषेबाहेर पाठवत असे. असेच एकदा २००४ साली भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी दोन्ही संघात झालेल्या ५ सामन्यांच्या वनडे मालिकेतील एका सामन्यात पाकिस्तानचा खतरनाक गोलंदाज शोएब अख्तरने मुद्दाम सेहवागची खोड काढली होती.
चौकार मारत केली बोलती बंद
तो सेहवागला राग आणून त्याची विकेट घेण्याच्या प्रयत्नात होता. त्यासाठी तो गोलंदाजी करायला आल्यानंतर दर चेंडूवर ‘चौकार मारुन दाखव’ असे म्हणत सेहवागला डिवचू लागला. मग सेहवागने अख्तरला जबरदस्त प्रत्युत्तर देत म्हटले की, ‘तू गोलंदाजी करतोय का भीख मागतोय.’ एवढेच नाही तर, सेहवागने सडेतोड शाब्दिक प्रत्युत्तरानंतर पुढील चेंडूवर जोरदार चौकार लगावला आणि अख्तरची बोलती बंद केली.
भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धची ती ५ सामन्यांची वनडे मालिका ३-२ ने जिंकली होती. दरम्यान सेहवागने १६४ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
हम भी है लाईन में! धोनीने नुकताच केलेला ‘मोठा’ विक्रम लवकरच होणार रोहितच्या नावावर
ट्रेंडिंग लेख-
HBD विरू : तो आला..त्याने पाहिलं..अन् त्याने जिंकलं ! भारतीय क्रिकेटचा खराखुरा ‘सुलतान’
क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलमॅन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले
सचिन तंबूत परतलेला असताना अझर, सिद्धूने केलेली ती खेळी वर्षानुवर्षे लक्षात ठेवली गेली