सोमवारी (१९ ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२०च्या ३७व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने मोठा विक्रम केला. राजस्थानविरुद्धचा सामना त्याचा आयपीएल कारकिर्दीतील २००वा सामना होता. हा विक्रम करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. त्याच्यानंतर लवकरच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा किर्तीमान त्याच्या नावावर करणार आहे.
२००८ साली आयपीएलमध्ये पदार्पण केलेल्या रोहितने आतापर्यंत १९७ सामने खेळले आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये २०० सामने खेळण्याच्या विक्रमापासून तो केवळ ३ पावले दूर आहे.
रोहितची आयपीएल आकडेवारी
रोहितने आयपीएलमध्ये १९७ सामने खेळत ३१.४५च्या सरासरीने ५१५८ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही नाबाद १०९ धावा इतकी राहिली आहे. तसेच त्याने आयपीएलमध्ये १ शतक आणि ३८ अर्धशतके लगावली आहेत. यात त्याच्या या हंगामातील आतापर्यंतच्या ९ सामन्यातील २६० धावांचाही समावेश आहे.
तिसऱ्या स्थानावर आहे रैना
धोनी-रोहितनंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याच्या विक्रमात ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाचे नाव येते. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १९३ सामने खेळले आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्सचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक १९१ सामन्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीही १८६ सामने खेळत या यादीत ५व्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘युवांमध्ये नाही तर चावला-जाधवसारख्या वयस्करांमध्ये कसली प्रतिभा,’ माजी क्रिकेटरची धोनीवर टीका
‘अजूनही सीएसकेसाठी प्लेऑफचे दरवाजे उघडे,’ माजी क्रिकेटरचे मोठे भाष्य
ट्रेंडिंग लेख-
क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलमॅन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले
सचिन तंबूत परतलेला असताना अझर, सिद्धूने केलेली ती खेळी वर्षानुवर्षे लक्षात ठेवली गेली
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १: सेहवाग रडत होता तर जॉन राईट शेजारच्या खोलीत सिगरेट ओढत होते…