---Advertisement---

कोरोनाग्रस्तांसाठी सेहवाग बनला ‘अन्नदाता’; तब्बल ५१ हजार पिडीतांना घरपोच पाठवले मोफत जेवण

---Advertisement---

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी सामान्य जनताच नव्हे तर अनेक सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटू देखील मदतीचा हात पुढे करत आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहलीसह अनेक क्रिकेटपटूंनी देणगी देऊन या लढ्यात हातभार लावला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने देखील मदतीचा हात पुढे करत गरजू व्यक्तींपर्यंत जेवण पोहोचवले आहे.

क्रिकेटच्या मैदानावर तुफान फटकेबाजी करणाऱ्या सेहवागने, वीरेंद्र सेहवाग फाऊंडेशन तर्फे गेल्या एक महिन्यापासून ५१ हजारांपेक्षा अधिक कोरोना रुगांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना घरी बनवलेले अन्न पोहोचवले आहे. याची माहिती वीरेंद्र सेहवाग फाउंडेशनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत दिली आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “दिल्ली एनसीआरमध्ये कोरोनाग्रस्त असलेल्या ५१ हजारपेक्षा अधिक रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोफत घरी बनवलेले जेवण पुरवण्यात आले आहे. दिल्ली एनसीआरमध्ये राहणाऱ्या कोणालाही कोरोनाची लागण झाली असेल तर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना घरी बनवलेले जेवण हवे असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता.” वीरेंद्र सेहवाग फाउंडेशनने केलेल्या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

वीरेंद्र सेहवागने देखील या ट्विटला रिट्विट केले आहे. हे कार्य करण्यापूर्वी सेहवागने सर्वांना पुढे येऊन मदत करण्यासाठी मागणी केली होती. कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी पॅट कमिन्सने देखील ३८ लाख रुपयांची देणगी दिली होती. त्यानंतर ब्रेट ली आणि अनेक भारतीय क्रिकेटपटूनी आर्थिक मदत केली होती. यामध्ये शिखर धवन, सचिन तेंडुलकर, रिषभ पंत आणि हनुमा विहारी यांचा समावेश आहे.

नुकतेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी सुरू केलेल्या कोरोना समर्थन मोहिमेला एका आठवड्यात तब्बल ११ कोटी रुपये देणगी मिळाली आहे. त्यांनी ७ दिवसात ७ कोटी देणगी गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले होते. यात त्यांनी देखील २ कोटींची देणगी दिली होती. तसेच या मोहिमेला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि त्यांना ११ कोटी देणगी गोळा करण्यात यश आले.

महत्त्वाच्या बातम्या-

कसोटी चॅम्पियनशीप फायनल: दमदार प्रदर्शनानंतरही ‘या’ ३ भारतीय खेळाडूंना बसावे लागू शकते बाकावर

‘भारतीय महिला संघातील घमेंडीपणा..,’ प्रशिक्षकपदावरुन सुट्टी झालेल्या रमण यांचे गांगुली-द्रविडला पत्र

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---