---Advertisement---

राहुल की गिल? इंग्लंड दौऱ्यावर जयस्वाल सोबत ओपनिंग कोणी करावी? ‘हा’ माजी क्रिकेटर म्हणाला…

On: शनिवार, मे 24, 2025 10:53 PM
Yashasvi Jaiswal and Shubman Gill
---Advertisement---

Virender Sehwag reacts to Indian Test team’s opening pair: भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. दरम्यान भारत-इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी शनिवारी (24 मे) बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली. भारतीय संघ निवडकर्त्यांनी रोहित शर्माचा उत्तराधिकारी म्हणून शुबमन गिलवर विश्वास व्यक्त केला आहे. रोहित शर्माने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, त्यानंतर गिल कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर होता. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतरची ही पहिलीच कसोटी मालिका असेल. अशा परिस्थितीत, या दोन्ही दिग्गजांची जागा कोण घेईल हे पाहणे मनोरंजक ठरेल.

निवडकर्त्यांनी इंग्लंड दौऱ्यासाठी केएल राहुल, साई सुदर्शन यांना संधी दिली आहे, त्यानंतर नवीन टॉप-ऑर्डरबाबत दिग्गजांच्या प्रतिक्रिया येत आहेत. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या मते, विराट कोहलीच्या जागी रिषभ पंत खेळला पाहिजे, तर साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यावे. क्रिकबझवर बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “पाहा, खूप सलामीवीर आहेत. शुबमन गिल ओपनिंग करतो, जयस्वाल ओपनिंग करतो. साई सुदर्शन ओपनिंग करतो. केएल राहुल ओपनिंग करतो. ईश्वरन, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकत नाही. या चौघांवर प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची जबाबदारी आहे, त्यांच्यात एक जोश आहे. जयस्वालने आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये चांगली कामगिरी केली आहे. शुबमन गिल कर्णधार आहे, तो खेळेल. तर हे तीन सलामीवीर आहेत आणि साई सुदर्शन इतक्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे की कर्णधार त्यालाही खेळवायला नक्कीच आवडेल.” (Virender Sehwag talking about the Indian team)

सेहवाग पुढे म्हणाला, “चौथ्या क्रमांकावर कोण खेळेल? तुम्ही केएल राहुलला चौथ्या क्रमांकावर खेळवाल का? की साई सुदर्शन किंवा रिषभ पंतला खेळवणार? चौथ्या क्रमांकासाठीची लढाई सुरूच राहील. कारण जो कोणी इंग्लंड मालिकेत चौथ्या क्रमांकावर खेळेल आणि धावा करेल, तो येणाऱ्या काळात चौथ्या क्रमांकावर खेळेल हे निश्चित होईल. माझ्या मते, गिल आणि जयस्वाल यांनी ओपनिग करावी. साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर, पंतने चौथ्या क्रमांकावर यावे. केएल राहुल पाचव्या क्रमांकावर यावा.”

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ- शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---