---Advertisement---

Video: ‘हा’ बडा खेळाडू वास्तवात बनलाय द्रविडच्या भयंकर रागाचा शिकार, विरेंद्र सेहवागचा मोठा खुलासा

On: रविवार, एप्रिल 11, 2021 3:20 PM
---Advertisement---

गेल्या काही दिवसांपासून माजी भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडने केलेली जाहिरात सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे. या जाहिरातीत शांत आणि संयमी असणाऱ्या राहुल द्रविडला आक्रमक आणि रागिष्ट दाखवण्यात आले आहे. अशातच माजी भारतीय फलंदाज विरेंद्र सेहवाग याने राहुल द्रविडची ही जाहिरात पाहिल्यानंतर मोठा गौप्यस्फोट केला आहे.

राहुल द्रविडने नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या क्रेड ॲपच्या जाहिरातीत काम केले आहे. या जाहिरातीत त्याला त्याच्या खऱ्या आयुष्यातील स्वभावाच्या उलट दाखवण्यात आले आहे. तो या जाहिरातीत जोर जोरात ओरडताना दिसून येत आहे. तसेच आपल्या बॅटने कारचे साईड मिरर तोडताना दिसून येत आहे. यासोबतच तो रस्त्याने चालणाऱ्या लोकांसोबत भांडण करताना देखील दिसून येत आहे. ही जाहिरात पाहिल्यानंतर अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.

अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू सेहवागने क्रिकबजला दिलेल्या मुलाखतीत मोठा खुलासा करत म्हटले की, “मी यापूर्वी देखील राहुल द्रविडला रागावताना पाहिले आहे. जेव्हा आम्ही पाकिस्तान दौऱ्यावर होतो, तेव्हा धोनी नवीनच संघात समाविष्ट झाला होता. त्यावेळी धोनी पॉईंटच्या क्षेत्रात शॉट खेळताना झेलबाद झाला होता. त्यावेळी राहुल द्रविडने धोनीवर राग करत म्हटले होते की, असा खेळतोस का तू?तुला सामना संपवायचा होता. त्याने इंग्लिशमध्ये खूप काही म्हटले होते जे ऐकुन मी देखील घाबरलो होतो.”

तसेच तो पुढे म्हणाला, “परंतु जेव्हा धोनी पुढच्या वेळी फलंदाजी करण्यासाठी आला. तेव्हा तो स्वतःला तो शॉट खेळण्यापासून सावरत होता. मी त्याला जाऊन विचारले की तू तुझे नैसर्गिक शॉट का खेळत नाहीस? तर तो म्हणाला होता की, मला पुन्हा द्रविडकडून ओरडा नाही खायचा. मी चुपचाप सामना संपवून मैदानाबाहेर जाईल.”

महत्त्वाच्या बातम्या-

विजयाच्या जल्लोषात दुखापतीची चिंता; दिल्ली कॅपिटल्सचा ‘हा’ स्टार क्रिकेटपटू जखमी, दोन सामन्यांना मुकणार?

सेम टू सेम! दिल्ली-चेन्नई सामन्यात अश्विनने केदारच्या गोलंदाजीची केली हुबेहुब नक्कल, व्हिडिओ व्हायरल

लाजली बघा! झहीर खान अनुष्का शर्माला म्हणाला असं काही, मिसेस कोहली लाजेने झाली लालबुंद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---