आयपीएल २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले आहे. चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाने चालू हंगामात मात्र पहिल्या १० पैकी फक्त ३ सामने जिंकले आहेत. सीएसकेच्या या खराब प्रदर्शनाचे खापर बऱ्याच अंशी रवींद्र जडेजा याच्यावर फुटले आहे. आता भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने देखील यासाठी जडेजाला कारणीभूत ठरवले आहे. सेहवागच्या मते धोनीने कर्णधारपद सोडले नसते, तर संघ अडचणीत आला नसता.
आयपीएल २०२२ हंगाम सुरू होण्याच्या दोन दिवस आधी एमएस धोनी (MS Dhoni) याने सीएसकेचे कर्णधारपद सोडले आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) संघाचा नवीन कर्णधार बनला. परंतु, त्याला ही जबाबदीरा पेलली नाही. जडेजाच्या नेतृत्वात सीएसकेने हंगामातील पहिले आठ सामने खेळले आणि त्यापैकी फक्त दोन सामने जिंकले. त्यानंतर जडेजाने स्वतःच्या इच्छेने संघाचे कर्णधारपद सोडले आणि धोनीली ही जबाबदीरी पुन्हा स्वीकारावी लागली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याच्या मते जेव्हा संघ व्यवस्थापनाने धोनीचे कर्णधारपद जडेजाला दिले, त्याच वेळी त्यांच्याकडून मोठी चूक झाली. सेहवाग म्हणाला की, “त्यांची ही सर्वात मोठी चूक होती की, त्याने धोनीला कर्णधारपदावरून काढून जडेजाला कर्णधार बनवले. त्यानंतर मला असे वाटते की, जेव्हा तुम्ही जडेजाला कर्णधार नियुक्त केलेच होते, तर त्याने पूर्ण हंगामासाठी या पदावर कायम राहिले पाहिजे होते.”
आरसीबीकडून बुधवारी (४ मे) सीएसकेला पराभव मिळल्यानंतर सेहवाग बोलत होता. “यावेळी त्यांची प्लेइंग इलेव्हन सेट नव्हती. सुरुवातीला ऋतुराज गायकवाडने धावा केल्या नाहीत. त्यांची सुरुवात खूप खराब झाली. नंतर फलंदाजांनी धावा केल्या नाहीत. त्यांच्यासाठी हंगाम खूप अडचणींनी भरलेला राहिला. पण जर सुरुवातीपासून एमएस धोनी कर्णधार असता, तर शक्यतो परिस्थिती चांगली असू शकत होती. कदाचीत सीएसकेने एवढे सामने गमावले नसते,” असे सेहवाग पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, सीएसकेला त्यांचा पुढचा सामना दिल्ली कॅपिटल्ससोबत खेळायचा आहे. हा सामना ८ मे रोजी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर आयोजित आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘त्याने आणखी पोरं जन्माला घातली पाहिजे’, खराब फॉर्ममधून जाणाऱ्या विराटला वॉर्नरचा भलताच सल्ला
एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए सुपर सिरीज अजिंक्यपद: देशभरांतून १२० खेळाडू सहभागी