पुणे। डेक्कन जिमखाना व महाटेनिस यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए 18वर्षांखालील सुपर सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत देशभरातून 120 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट या ठिकाणी 7 मे ते 13 मे 2022 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धा संचालक प्रसनजीत पॉल यांनी सांगितले की, स्पर्धेत अहमदाबाद, मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या ठिकाणांहून खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तीपत्रक व गुण देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी लीना नागेशकर यांची स्पर्धा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
राज्य व्हॉलीबॉल संघाच्या प्रशिक्षण शिबिरास शानदार प्रारंभ
विराटला दक्षिण अफ्रिका, आयर्लंडविरुद्ध मिळणार विश्रांती? नक्की काय असेल पुढील योजना, वाचा सविस्तर