माजी भारतीय सलामीवीर आणि नजफगडचा सुलतान वीरेंद्र सेहवाग आपल्या आक्रमक आणि विस्फोटक अंदाजासाठी ओळखला जातो. जुनी हिंदी सदाबहार गाणी गात असताना चेंडू लीलया सीमेपार टोलवणारा हा फलंदाज. क्रिकेटचा कोणताही प्रकार असो पहिल्याच चेंडूवर चौकार मारून सेहवाग विरोधी संघावर आक्रमण करीत असे. क्रिकेटविश्वातील सर्वश्रेष्ठ गोलंदाजसुद्धा भारताच्या या सलामीवीराला गोलंदाजी करायला घाबरत असत. या गोष्टीची खात्री सेहवागचे विक्रमचं करून देतात.
असाच एक चकित करणारा विक्रम सेहवागच्या नावे आहे. सेहवागने फक्त 2 चेंडूत 21 धावा केल्या होत्या. खूप कमी लोकांना याबद्दल माहितीय की, भारताच्या या माजी सलामीवीराने 2004 मध्ये भारत आणि पाकिस्तान वनडे सामन्यादरम्यान माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज नावेद-उल-हसनला 2 चेंडूत 21 धावा चोपल्या होत्या.
त्या सामन्यात गोलंदाजी करायला आलेल्या राणा नावेदच्या पहिल्याच चेंडूवर विरुने चौकार लगावला आणि अंपायरने तो चेंडू नो बॉल घोषित केला. दुसऱ्या चेंडूवर देखील सेहवागने चौकार वसूल केला आणि तो सुद्धा नो बॉल दिला गेला. त्यानंतर राणाने अजून एक नो बॉल टाकला. त्यामुळे भारतीय संघाने कोणताही चेंडू वाया न घालवता 11 धावा जोडल्या.
त्यानंतर पुन्हा नावेदने सेहवागला नो बॉल टाकला आणि सेहवागने फ्री हिटचा फायदा घेत चौकार मारला. नो बॉल आणि चौकार मिळून संघाच्या 1 चेंडूवर तब्बल 16 धावा जोडल्या गेल्या. पुढील चेंडू पुन्हा नो बॉल टाकला आणि विरुने नेहमीप्रमाने त्याचा फायदा घेत चौकार लगावला. अशाप्रकारे फक्त 2 चेंडूत तब्बल 21 धावा सेहवाग आणि भारतीय संघाच्या नावे जमा झाल्या. यात सेहवागच्या 4 चौकारांच्या मदतीने 16 धावा आणि नो बॉलच्या 5 धावांचा समावेश होता.
पुढे पाकिस्तानच्या या माजी गोलंदाजाने शेवटच्या 3 चेंडूत फक्त 3 धावा देऊन आपले षटक संपवले होते. या षटकात भारतीय संघाच्या खात्यात एकूण 24 धावा जमा झाल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात खराब षटकांत याची गणना केली जाते. त्याचबरोबर यामुळे सेहवागच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच चेंडूवर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील जमा झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा भारतीय संघाच्या अकराच्या अकरा खेळाडूंनी केली होती गोलंदाजी, वाचा त्या सामन्याबद्दल
केएल राहुल पहिल्यांदा करणार भारतीय टी२० संघाचे नेतृत्व, पाहा कशी राहिलीय कर्णधाराच्या रूपात कामगिरी
विश्वचषकातील सरासरी प्रदर्शनानंतरही भारतीय क्रिकेटर टॉप-१०मध्ये कायम, स्म्रीती ‘या’ स्थानी कायम