इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू राहुल तेवतिया जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. केवळ फलंदाजीत नव्हे, तर हा धुरंधर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही अतुलनीय कामगिरी करत आहे. शनिवारी (१७ ऑक्टोबर) दुबई येथे रॉयल चॅलेजर्स बेंगलोरविरुद्ध झालेल्या सामन्यातही त्याने बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीचा शानदार झेल पकडत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या या झेलला पाहिल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग स्वत:ला तेवतियाची प्रशंसा करण्यापासून थांबवू शकला नाही.
सेहवागेन ट्विट करत अनोख्या शब्दात त्याची प्रशंसा केली आहे. तेवतियाचा झेल घेतानाचा फोटो शेअर करत सेहवागने लिहिले की, “तेवतिया काहीही करु शकतो. जर त्याला कोरोना व्हायरसची लस बनवण्याची एक संधी मिळाली. तर जसे आता त्याचे दिवस चालू आहेत, त्यावरुन मला वाटते की तो तेही बनवेल.”
बेंगलोर विरुद्ध राजस्थान संघातील सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १७७ धावा केल्या होत्या प्रत्युत्तरादाखल विराटने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत १३व्या षटकापर्यंत १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या होत्या. पण त्यांनतर १३.१ षटकात तेवतियाने सीमारेषेजवळ विराटचा अप्रतिम झेल पकडला आणि त्याला मैदानाबाहेर पाठवले.
Tewatia kuchh bhi kar sakte hain.
Agar Covid vaccine banane ka ek mauka mil gaya, toh jaisa unka time chal raha hai , lagta hai bana denge. What a season for him. #RRvRCB pic.twitter.com/WYY5mojrKC— Virender Sehwag (@virendersehwag) October 17, 2020
असे असले तरी, पुढे बेंगलोरचा यष्टीरक्षक फलंदाज एबी डिविलियर्सने २२ चेंडूत ५५ धावांची अफलातून खेळी करत संघाला ७ विकेट्सने सामना जिंकून दिला. महत्त्वाचे म्हणजे, या हंगामात यापुर्वीही बेंगलोर विरुद्ध राजस्थान संघात सामना झाला होता. त्या सामन्यातही बेंगलोरने राजस्थानला ८ विकेट्सने पराभवाची धूळ चारली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
‘कट रचून दिनेश कार्तिकची कर्णधार पदावरुन हाकालपट्टी’, माजी क्रिकेटरच्या प्रतिक्रियेने खळबळ
तूच रे पठ्ठ्या! कोलकाताच्या धुरंदराने केली धोनीच्या ७ वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी
एकच नंबर भावा! राहुल तेवतियाच्या अँकल ट्विस्टने कोहलीच्या ‘विराट’ शॉटला अडवलं
ट्रेंडिंग लेख-
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’
दुखापतग्रस्त असतानाही गोलंदाजी करण्याची जिद्द दाखवणाऱ्या कुंबळेचा आज वाढदिवस…
आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली