भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा त्याच्या वादळी फलंदाजीसोबतच शानदार गोलंदाजीसाठीही ओळखला जातो. सेहवागचे नाव त्या खेळाडूंच्या यादीत सामील होते, ज्यांनी भारतीय संघासाठी पार्ट-टाईम गोलंदाजी करत मोलाचे योगदान दिले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सेहवागने सांगितले की, त्याला विराट कोहलीचा इतका राग आला होता, जितका त्याला त्रिशतक हुकल्यानंतरही आला नव्हता. सेहवागचे हेच वक्तव्य आता सर्वत्र चर्चेत आहे.
जेव्हा विराटने सोडला होता झेल
वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने नुकतेच रणवीर इलाहाबादिया याच्या युट्यूब चॅनेलचा भाग बनला होता. यावेळी त्याने त्याच्या कारकीर्दीतील एका सामन्याचा उल्लेख करताना सांगितले की, “मी गोलंदाजी करत असताना विराटने झेल सोडला होता, तेव्हा मला खूपच वाईट वाटले होते. मला त्याचा इतका राग आला होता, जितका राग मला माझे त्रिशतक हुकल्यानंतरही आला नव्हता.”
‘कुणीच विचार केला नव्हता विराट यशाचे शिखर चढेल’
पुढे बोलताना सेहवाग म्हणाला की, “विराट कोहली याच्या फलंदाजीवर कुणीही कधीच शंका घेतली नाही. मात्र, कुणालाही माहिती नव्हते की, विराट कोहली त्याच्या कारकीर्दीत यशाच्या शिखरावर पोहोचेल. विराटने त्या सामन्यात झेल सोडल्यानंतर शतक ठोकले. आम्हाला समजले होते की, त्याच्यामध्ये प्रतिभेची कोणतीही कमतरता नाही. मात्र, तो त्याच्या कारकीर्दीत 70-75 शतके ठोकेल, हे माहिती नव्हते.”
गोलंदाजीनेही केलंय प्रभावित
विशेष म्हणजे, वादळी फलंदाजी करणाऱ्या सेहवागचे नाव सर्वोत्तम पार्ट-टाईम गोलंदाजांमध्ये गणले जाते. त्याने 104 कसोटी सामन्यात 40 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील दिल्लीत कसोटीत त्याने पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. याव्यतिरिक्त त्याने 251 वनडे सामन्यात 96 विकेट्स घेतल्या आहेत. खरं तर, सेहवागने कारकीर्दीतील शेवटचा सामना 2013 साली खेळला होता. सेहवागने वनडे कारकीर्दीत द्विशतकही ठोकले आहे. (virender sehwag was angry with virat kohli know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: चेन्नईत पाऊल ठेवताच स्टोक्सचा राडा सुरू! नेट्समध्येच लावला षटकारांचा धडाका
धोनीला कोणती गोष्ट बनवते सर्वात वेगळा कर्णधार? खुद्द गावसकरांनी सांगितलंय कारण, जाणून घ्याच