रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहली आयपीएल २०२२च्या हंगामात विशेष प्रदर्शन करू शकला नाही. प्लेऑफ सामन्यातही त्याचे खराब प्रदर्शन चालूच राहिले. तो या हंगामात १६ सामने खेळताना ३ वेळा गोल्डन डक (पहिल्याच चेंडूवर विकेट) झाला. त्याच्या बॅटमधून जेमतेम २ अर्धशतके निघाली. असे असले तरीही, माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याला वाटते की, विराटसाठी हा हंगाम तितकाही वाईट राहिलेला नाही.
विराटच्या (Virat Kohli) चालू हंगामातील सरासरी प्रदर्शनाबाबत क्रिकबजवरील एका कार्यक्रमात बोलताना सेहवाग (Virender Sehwag) म्हणाला की, “जेव्हा विराटचे प्रदर्शन खालावले असेल, तेव्हा तुम्ही अपेक्षा करता की तो ४ किंवा ५ वेळा फ्लॉप होईल. परंतु तुम्ही अशी अपेक्षा करणार नाही की, त्याने जवळपास ८ सामन्यांमध्ये धावाच केल्या नाहीत. असे असूनही विराटने यावर्षी ३०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यामुळे मी असे म्हणणार नाही की, त्याच्यासाठी हा हंगाम खूप खराब राहिला आहे.”
विराटने चालू हंगामात केल्या आहेत ३०० पेक्षा जास्त धावा
दरम्यान धावा करण्यासाठी संघर्ष करताना दिसलेल्या विराटने (Virat Kohli Poor Performance) आयपीएलच्या पंधराव्या हंगामात १६ सामने खेळताना २२.७३ च्या सरासरीने ३४१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ अर्धशतके केली आहेत. तसेच ७३ ही त्याची सर्वाधिक धावसंख्या राहिली आहे. तो चालू हंगामात बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनंतर सर्वाधिक धावा करणारा दुसराच फलंदाज आहे. फाफने बेंगलोरकडून १६ सामने खेळताना सर्वाधिक ४६८ धावा केल्या आहेत.
बेंगलोरच्या स्वप्नांचा पुन्हा चुराडा
बेंगलोर संघ यंदा आयपीएल चषक विजयाचा प्रबळ दावेदार वाटत होता. फाफच्या नेतृत्त्वाखाली १४ पैकी ८ सामने जिंकत बेंगलोरने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. तसेच प्लेऑफमध्ये एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सला पराभूत करत दुसऱ्या क्वालिफायर सामन्याचेही तिकीट मिळवले. मात्र दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सने बेंगलोरवर ७ विकेट्सने मात करत पुन्हा एकदा त्यांच्या स्वप्नांना चुराडा केला आहे.
महास्पोर्ट्सचा वॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बटलरने विलियम्सनला मागे टाकलेच, पण आता वॉर्नरचा ६ वर्ष जुना ‘हा’ विक्रमही धोक्यात
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे ३१ मे पासून पुण्यात आयोजन