---Advertisement---

वीरेंद्र सेहवागच्या ‘या’ शतकाला झाले १८ वर्षे पूर्ण; शेअर केला खास व्हिडिओ

On: रविवार, ऑगस्ट 9, 2020 9:08 AM
---Advertisement---

दिल्ली। भारतीय माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने सलामीवीर म्हणून केलेल्या आपल्या पहिल्या कसोटी शतकाचा व्हिडिओ ट्विटरवर एका कमेंटसह रिट्विट केला आहे. हा व्हिडिओ रॉब मूडी नावाच्या ट्विटर युझरने शेअर केला होता. हा व्हिडिओ रिट्विट करताना सेहवागने कॅप्शनमध्ये लिहिले की, “एक उत्तम आठवण!”

सेहवागने कसोटीत ८ ते १२ ऑगस्ट दरम्यान इंग्लंड विरुद्ध ट्रेंट ब्रिज, नॉटिंगघम येथे झालेल्या कसोटी सामन्यात सलामीवीर म्हणून खेळताना पहिले शतक केले होते. त्यावेळी त्याने १८३ चेंडूत १०६ धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने १८ चौकार मारले होते. विशेष म्हणजे या सामन्यादरम्यानही सेहवागने आपल्या ज्ञात शैलीत फलंदाजी केली. त्याने चौकार ठोकत आपले शतक पूर्ण केले होते. त्यावेळी त्याने इंग्लंडच्या अँड्र्यू फ्लिंटॉफ, डॉमिनि कॉर्क, स्टीव्ह हर्मसन या गोलंदाजांची धुलाई केली होती. या घटनेला १८ वर्षे पूर्ण झाले.

सेहवागने २००१ ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. या पदार्पणाच्या सामन्यातच त्याने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते. पण त्यावेळी तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. पदार्पणानंतर ५ कसोटी सामने खेळल्यावर सेगवागला सलामीला खेळण्याची संधी मिळाली. यानंतर मात्र सेहवागने कधीही मागे वळून पाहिले नाही.

त्याने त्याच्या कारकिर्दीत कसोटीमध्ये १०४ सामने खेळताना ४९.३४ च्या सरासरीने ८५८६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २३ शतकांचा आणि ३२ अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे तो कसोटीत २ त्रिशतके करणारा भारताचा एकमेव क्रिकेटपटू आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

कसोटीत इंग्लंडच्या कर्णधाराला बाद करणारा नसीम शाह दुसरा युवा गोलंदाज, पहिल्या क्रमांकावर आहे हा भारतीय

शोएब अख्तरने धोनीला जाणून बुजून टाकलेल्या त्या बीमरचा आजही होतोय पश्चाताप

विराट कोहलीच्या लग्नात झाली होती धोनीच्या रिटायरमेंटवर चर्चा

ट्रेंडिंग लेख –

‘जेंटल जायंट’ या नावाने प्रसिद्ध झालेला अँगस फ्रेझर

रणजी सामना खेळण्यापूर्वीच भारतीय संघात निवड झालेले दिलीप सरदेसाई

आयपीएल २०२०मधून हे १० युवा खेळाडू करतील आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरवात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---