fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कसोटीत इंग्लंडच्या कर्णधाराला बाद करणारा नसीम शाह दुसरा युवा गोलंदाज, पहिल्या क्रमांकावर आहे हा भारतीय

Youngest bowlers to dismiss England captain in Men's Test cricket,

August 8, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

मँचेस्टर। बुधवारपासून(5 ऑगस्ट) ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडला विजयासाठी 277 धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना आज(8 ऑगस्ट) सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने दुसऱ्या डावात 117 धावांत 5 विकेट्स गमावल्या आहेत. यात इंग्लंडचा कर्णधार जो रुटच्या विकेटचाही समावेश आहे.

रुट 42 धावांवर इंग्लंडच्या दुसऱ्या डावात नसीम शाहने गोलंदाजी केलेल्या 39 व्या षटकात झेलबाद झाला. नसीमने टाकलेला चेंडू रुटच्या बॅटची कड घेऊन पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या बाबर आझमकडे गेला आणि आझमनेही चूक न करता तो चेंडू पकडला. त्यामुळे रुटला त्याची विकेट गमवावी लागली. रुटची विकेट घेतल्यानंतर नसीमने एक खास विक्रम रचला आहे.

नसीम पुरुषांच्या कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या कर्णधाराला बाद करणारा दुसऱ्या क्रमांकाचा युवा गोलंदाज ठरला आहे. नसीमचे आजचे वय 17 वर्षे 175 दिवस इतके आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचा गोलंदाज पियुष चावला आहे. त्याने 2006 ला मोहाली येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पणाच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार अँड्र्यू फ्लिंटॉफला इंग्लंडच्या दुसऱ्या डावात बाद केले होते. त्यावेळी चावलाचे वय 17 वर्षे 79 दिवस होते.

सध्या ओल्ड ट्रॅफर्डवर सुरु असलेल्या कसोटीत इंग्लंडने 62 षटकांपर्यंत 5 विकेट्स गमावून 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

पुरुष कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या कर्णधाराला बाद करणारे युवा गोलंदाज –

17 वर्षे 79 दिवस – पियुष चावला, मोहाली, 2006 (अँड्र्यू फ्लिंटॉफ)

17 वर्षे 175 दिवस – नसीम शाह, मँचेस्टर,2020 (जो रुट)

महत्त्वाच्या बातम्या – 

शोएब अख्तरने धोनीला जाणून बुजून टाकलेल्या त्या बीमरचा आजही होतोय पश्चाताप

विराट कोहलीच्या लग्नात झाली होती धोनीच्या रिटायरमेंटवर चर्चा

आयपीएल इतिहासातील सर्वात मोठे वाद; यांपैकी किती वाद तुम्हाला आठवतात?

ट्रेंडिंग लेख –

आयपीएल २०२०मधून हे १० युवा खेळाडू करतील आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरवात

चाहत्यांची उत्सुकता शिगेला! एका वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ‘या’ ५ भारतीय खेळाडूंना पुन्हा मैदानावर पाहायला मिळणार

वाचा आयपीएलचं संपुर्ण अर्थशास्त्र: कसा येतो आयपीएलमध्ये पैसा?


Previous Post

आयपीएल २०२०मधून हे १० युवा खेळाडू करतील आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरवात

Next Post

रणजी सामना खेळण्यापूर्वीच भारतीय संघात निवड झालेले दिलीप सरदेसाई

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘गब्बर’ची चेन्नईवर दादागिरी! धवनने घातली ‘या’ मोठ्या विक्रमला गवसणी

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला वादळी खेळीने घाम फोडणाऱ्या २१ वर्षीय पृथ्वी शॉने केली गिलची बरोबरी आता केवळ पंत आहे पुढे

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

लईच वाईट!! पहिल्याच सामन्यात एमएस धोनी क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

IPL2021: पृथ्वी शॉ आणि शिखर धवनची वादळी अर्धशतके; दिल्लीचा चेन्नईवर ७ विकेट्सने दणदणीत विजय

April 10, 2021
IPL

किती ते दुर्दैव! रैनाची अर्धशतकी तुफानी खेळी अशा पद्धतीने आली संपुष्टात, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाचे दमदार पुनरागमन! पहिल्याच सामन्यात अर्धशतकासह विराट, रोहितची केली बरोबरी

April 10, 2021
Next Post

रणजी सामना खेळण्यापूर्वीच भारतीय संघात निवड झालेले दिलीप सरदेसाई

'जेंटल जायंट' या नावाने प्रसिद्ध झालेला अँगस फ्रेझर

वीरेंद्र सेहवागच्या 'या' शतकाला झाले १८ वर्षे पूर्ण; शेअर केला खास व्हिडिओ

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.