भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यादरम्यान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना तिसऱ्या दिवशीच संपला. भारतीय संघाने एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवत ३-१ अशा फरकाने मालिका आपल्या नावे केली. या विजयासह भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली. भारतीय संघाच्या या उपलब्धीनंतर सर्व क्रिकेट जगतातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने देखील हटके ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले.
सेहवागने केले भारतीय संघाचे अभिनंदन
भारतीय संघाच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर सर्व आजी-माजी क्रिकेटपटू, समीक्षक व चाहते खेळाडूंचे अभिनंदन करत आहेत. भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने देखील ट्विट करून विजेत्या भारतीय संघाचे अभिनंदन केले. नेहमीप्रमाणे सेहवागने एक हटके ट्विट करून भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.
सेहवागने ट्विट करताना लिहिले, ‘भारतीय संघाचे या अद्भुत मालिका विजयाबद्दल अभिनंदन. इंग्लंडचा संघ अहमदाबाद येथे नाहीतर, या ठिकाणी हरला.’
सेहवागने या ट्विटसोबत मेंदूचे एक छायाचित्र शेअर केले आहे. सेहवागच्या ट्विटचा अर्थ असा होतो की, इंग्लिश फलंदाजांनी फिरकीची भीती डोक्यामध्ये ठेवल्याने त्यांना हा पराभव पत्करावा.
Congratulations Team India on an awesome Test Series victory.
England didn't lose it in Ahmedabad.
They lost it here .#INDvsENG pic.twitter.com/NXb1AxCHen— Virender Sehwag (@virendersehwag) March 6, 2021
भारताने जिंकली मालिका
अहमदाबाद येथील चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने इंग्लंडचा दुसरा डाव गुंडाळत चार सामन्यांची मालिका ३-१ अशा फरकाने आपल्या नावे केली. इंग्लंडने पहिल्या डावात २०५ धावा केल्यानंतर भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजीचा नमुना सादर करत ३६५ धावा ठोकल्या. इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या १३५ धावांवर सर्वबाद झाला.
सामनावीराचा पुरस्कार रिषभ पंत तर, मालिकावीराचा पुरस्कार रविचंद्रन अश्विनला देण्यात आला. या विजयासह भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जुलै महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, कर्णधारांच्या ‘या’ यादीत पटकावले दुसरे स्थान
एबी डिविलियर्सने केले विराटचे कौतुक; म्हणाला, ‘त्याच्या नेतृत्वाने युवा क्रिकेटपटूंना….’
धक्कादायक! माजी रणजीपटूला ४० लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी अटक