---Advertisement---

‘त्याच्या’ फटकेबाजीला पाहून मला माझ्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण झाली; सेहवागने केली स्तुती

On: गुरूवार, एप्रिल 1, 2021 12:02 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा नवोदित यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून भारतीय संघाच्या विजयामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे. इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत देखील त्याने चौफेर फटकेबाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिले होते. यापूर्वी त्याच्या फलंदाजीवर टीका केली जायची, परंतु आता त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. अशातच आता माजी भारतीय फलंदाजा विरेंद्र सेहवागने त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.

इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत रिषभने चौफेर फटकेबाजी करत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला होता. त्याने वनडे मालिकेतील ३ सामन्यात १५५ धावा केल्या होत्या. या उल्लेखनीय कामगिरीनंतर भारतीय संघाचा माजी फलंदाज सेहवाग याने रिषभचे तोंडभरून कौतुक करत, तो येणाऱ्या काळात भारतीय संघाचा स्टार खेळाडू बनेल असे वक्तव्य केले आहे.

तो म्हणाला की, “इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत रिषभ पंतला सकारात्मक मानसिकतेने खेळताना पाहून मला आनंद झाला. बाकी लोक काय म्हणतील याची पर्वा न करता, तो बिंनधास्त होऊन आपला नैसर्गिक खेळ खेळत होता. या वनडे मालिकेत ज्याप्रकारे रिषभने फलंदाजी केली आहे, त्याने मला माझ्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून दिली आहे. ”

रिषभ पंत होऊ शकतो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सुपरस्टार

विरेंद्र सेहवाग पुढे म्हणाला, “जर रिषभ पंतने चांगली सुरुवात मिळाल्यानंतर त्या सुरुवातीला मोठ्या स्कोअरमध्ये बदलण्यास सुरवात केली. तर तो व्हाईट बॉल क्रिकेटचा पुढील सुपरस्टार होऊ शकतो. पंतला त्याच्या फलंदाजीमध्ये थोडा बदल करण्याची गरज आहे, ज्यामुळे त्याला धावा करणे सोपे होईल. पंतला वनडे आणि टी-२० सामन्यांमध्ये शेवटपर्यंत फलंदाजी करायला शिकावे लागेल. जर त्याने ही सर्व कौशल्ये आपल्या फलंदाजीमध्ये आत्मसात केली तर नक्कीच तो व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्टार खेळाडू बनू शकतो.”

महत्त्वाच्या बातम्या-

‘चाळीस वर्षांचा झालोय, पण स्वत:ला सिद्ध करुन दाखवायची गरज…,’ भज्जीचे टिकाकारांना जबरदस्त प्रत्युत्तर

श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत अनुभवी अमित मिश्रा बजावणार ‘ही’ मोठी भूमिका

कॅप्टन वगैरे तुमच्या देशात! आयपीएलमध्ये फक्त खेळाडू म्हणून खेळलेले विदेशी कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---