गुरुवारी (13 एप्रिल) आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा सामना खेळला गेला. मोहाली येथे झालेल्या या सामन्यात गुजरातने पंजाबला थरारक सामन्यात मात दिली. गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीनंतर शुबमन गिलने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे गुजरातने सामना 6 गडी राखून आपल्या नावे केला. गुजरातच्या विजयात गिलचे महत्त्वाचे योगदान राहिले असतानाच भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने त्याच्यावर टीका केली आहे.
विजयासाठी मिळालेले 154 धावांचे आव्हान पार करताना गुजरातने अखेरच्या षटकात विजय मिळवला. सलामीला आलेला गिल अखेरच्या षटकात बाद झाला. त्याने 49 चेंडूवर 67 धावा केल्या. त्याच्या याच संथ खेळीमुळे सहवागने त्याच्यावर टीका केली. सेहवाग म्हणाला,
“गिलने 49 चेंडूवर 67 धावा केल्या. मात्र, अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याने 41-42 चेंडूच घेतलेले. त्याने अर्धशतक झाल्यावर वेगाने धावा केल्या. त्याने असे केले नसते तर अखेरच्या षटकात गुजरातला विजयासाठी 16-17 धावा राहिल्या असत्या.”
सेहवाग पुढे म्हणाला,
“त्याने वैयक्तिक विक्रमांसाठी खेळू नये. संघाला जशी गरज आहे तसाच खेळ दाखवावा. तुम्ही असा विचार करू शकत नाही की, मी माझे अर्धशतक बनवतो आणि आपण कसेही करून सामना जिंकू. ज्यावेळी तुम्ही असा विचार करता त्यावेळी क्रिकेटकडून तुम्हाला योग्य शिक्षा मिळते.”
सेहवाग याने म्हटल्याप्रमाणे गिल पावर प्लेमध्ये काहीसा आक्रमक खेळलेला. मात्र, त्यानंतर त्याचा स्ट्राईक रेट कमी आला. अर्धशतकानंतर त्याने पुन्हा आक्रमक खेळ करत संघाला विजयाच्या नजीक नेलेले. मात्र, संघ विजयाच्या जवळ आला असताना तो अखेरच्या षटकात त्रिफळाचीत झाला.
(Virendra Sehwag Slams Shubman Gill On His Slow Inning Against Punjab Kings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अटीतटीच्या लढतीत नंदुरबार हिमालयन ताहर्स संघाचा विजय
सांगली सिंध सोनिक्स संघाची रत्नागिरी अरावली ॲरोज संघावर मात