---Advertisement---

सेहवागचा हिंदी गाण्यातून सनरायझर्सला छुपा संदेश, केले ‘हे’ ट्विट

On: शुक्रवार, एप्रिल 16, 2021 12:05 AM
---Advertisement---

आयपीएल २०२१ मध्ये बुधवारी (१४ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) व सनरायझर्स हैदराबाद यांच्यादरम्यान सामना खेळला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा. विजयाच्या जवळ गेल्यानंतर पराभव झाल्याने हैदराबादच्या खेळाडूंवर टीका होत आहे. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही हैदराबादच्या पराभवानंतर एक ट्विट केले. त्याने आपल्या ट्विटद्वारे वॉर्नरच्या संघाला एक मोठा संदेशही दिला आहे.

सेहवागने केले हे ट्विट
खरं तर सेहवागने सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज केन विलियम्सनचा फोटो पोस्ट केला आणि त्याला कॅप्शन देताना, प्रसिद्ध हिंदी गाणे, ‘किसका है यह तुमको इंतजार, मै हूं ना ‘ लिहिले. सेहवागने आपल्या ट्विटद्वारे हैदराबाद संघाला निरोप पाठविला आहे की, संघ सतत पराभूत होत असताना, इतका मोठा खेळाडू असूनही तो बाकावर का बसला आहे?

सनरायझर्स हैदराबादने हंगामातील पहिल्या दोन सामन्यात विलियम्सनला अंतिम ११ मध्ये संधी दिली नाही. विलियम्सनची आयपीएल आकडेवारी अप्रतिम आहे. त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत ५३ सामने खेळले आहेत. यामध्ये, १५ अर्धशतकांच्या मदतीने त्याने १६१९ धावा फटकावल्या आहेत. २०१८ आयपीएलमध्ये त्याने सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजाला दिली जाणारी ऑरेंज कॅप मिळवली होती.

हैदराबादला पत्करावा लागला पराभव
बुधवारी आरसीबीने हैदराबादला ६ धावांनी पराभूत केले. आरसीबीने दिलेल्या १४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघाने जवळजवळ सामना जिंकला होता, परंतु शेवटच्या षटकात हर्षल पटेलच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे संघ २० षटकांत केवळ १४३ धावा करू शकला आणि सामना गमावला. शेवटच्या षटकात हैदराबादला विजयासाठी १६ धावांची आवश्यकता होती. राशिद खानने विजयासाठी प्रयत्न केले होते. मात्र, तो बाद झाल्याने हैदराबादचा आशा संपुष्टात आल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

वामीकाबद्दल बोलताना ‘बाप’माणूस विराट कोहली झाला भावूक; म्हणाला, ‘ती जेव्हा हसते तेव्हा…’

सीएसकेच्या फलंदाजांना अडचणीत आणणारा फझल फारूखी आहे तरी कोण?, घ्या जाणून

डिविलियर्स, धोनीलाही भारी पडला रिषभ पंत; राजस्थानविरुद्ध अर्धशतक करत केला ‘हा’ विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---