काल (8 मार्च) जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 85 धावांनी जिंकला आणि पाचव्यांदा टी20 विश्वचषकावर आपले नाव कोरले.
असं असलं तरी उपविजेत्या भारतीय महिला संघाची वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी पाठराखण केली आहे. रिचर्ड्स यांनी ट्वीट केलेे आहे की “कधीही निराश होऊ नका. तुम्ही विश्वचषकात उत्कृष्ट खेळ केला आहे आणि एक दिवस विश्वचषक नक्की तुमच्याकडे असेल. स्वत:वर विश्वास ठेवा!”
काल पार पडलेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने एलिसा हिली(75) आणि बेथ मूनी(78*) यांनी केलेल्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 4 बाद 184 धावा केल्या आणि भारताला 185 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव 19.1 षटकातच 99 धावांवर संपुष्टात आला.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषकाच्या फायनलनंतर ऑस्ट्रेलिया, भारत संघाला मिळाले एवढे करोड रुपये
–ते दोन झेल टीम इंडियाला विश्वचषकाच्या फायनलमध्ये पडले सर्वात महाग