२९ मार्चपासून सुरु होणारा आयपीएलचा १३ वा मोसम कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आला होता. पण आता १९ सप्टेंबरपासून या आयपीएल मोसमाला युएईमध्ये सुरुवात होत आहे. यादरम्यान आता या मोसमासाठी चायनीज कंपनी विवो मुख्य प्रायोजकत्व देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विवो कंपनीने भारत आणि चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी त्यांच्या प्रायोजकतेच्या करारातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या या मोसमासाठी नवीन स्वतंत्र प्रायोजक बीसीसीआयला शोधावा लागेल.
विवोचा ३ वर्षांचा करार बाकी आहे. हा ३ वर्षांचा करार विवो २०२१, २०२२ आणि २०२३ ला पूर्ण करेल. वास्तविक पहाता विवोचा आयपीएलचे मुख्य प्रायोजक म्हणून ५ वर्षांचा करार होता. जो २०२२ पर्यंत होता आणि या करारातून बीसीसीआयला वर्षाकाठी ४४० कोटी रुपये मिळतात.
याआधी विवोलाच मुख्य प्रायोजक ठेवणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर आयपीएल आणि बीसीसीआयवर मोठ्या प्रमाणात टिका झाली होती. पण आता अखेर यावेळी विवो प्रायोजक असणार नाही.
आयपीएलमध्ये पेटीएम, ड्रीम 11, बायजूस आणि स्विगी या कंपनींनीही गुंतवणूक केलेली आहे.
काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने चीनच्या टिक-टॉक (Tik- Tok) समवेत ५९ ऍपवर बंदी घातली होती. तसेच मागील अनेक दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये तणावाचे संबंध निर्माण झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
२०१९ वर्ल्डकपमधील ५ पैकी हे शतक रोहित शर्माचे खास, कारणही आहे विशेष
भारतीय संघातील ‘या’ खेळाडूला धोनी म्हणतो, काय रे म्हाताऱ्या
३७ चेंडूत खणखणीत शतक करताना आफ्रिदीने वापरली होती या भारतीय क्रिकेटरची बॅट
ट्रेंडिंग लेख –
लॉर्ड्सवरील ऑनर्स बोर्डवर नाव नसलेले ५ महान फलंदाज
वनडे सिरीज म्हटले की ‘हे’ ३ कर्णधार हिरो ठरणारच, पहा काय आहेत कारनामे
आयपीएल २०२०: युएईमध्ये शतक झळकावू शकतात हे मुंबई इंडियन्सचे ३ धडाकेबाज फलंदाज…