भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण हा सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) संचालक म्हणून काम पाहत आहे. मागील महिन्यात त्याला आयर्लंड विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून देखील जबाबदारी दिली गेलेली. त्यानंतर तो पुन्हा एनसीएत आल्यानंतर युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसला होता. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) त्याच्या खांद्यावर अतिरिक्त जबाबदारी टाकली आहे.
आयसीसीने दिली ही जबाबदारी
मंगळवारी (२६ जुलै) आयसीसीची महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये काही मुख्य निर्णय घेतले गेले. आयसीसीने सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंचे प्रतिनिधी म्हणून आयसीसी पुरुष क्रिकेट समितीवर, या खेळाडूंचे प्रतिनिधी म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण व न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हेटोरी यांना संधी दिली. तसेच माजी खेळाडूंचे प्रतिनिधी म्हणून रॉजर हार्पर यांची निवड केली गेली. श्रीलंकेचा माहेला जयवर्धने आधीपासूनच या समितीचा सदस्य आहे.
याच बैठकीत आणखी काही मुख्य मुद्द्यांबाबतही माहिती दिली गेली. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आपली नवी वर्किंग कमिटी या बैठकीत सादर केली. त्या कमिटीला आयसीसीने मान्यता दिली आहे. यासोबतच अफगाणिस्तानात महिला क्रिकेटसाठी काय प्रयत्न केले जात आहेत याची माहिती देखील आयसीसीने मिळवली.
या संघांना मिळाले आयसीसीचे सदस्यत्व
या बैठकीतील महत्त्वाच्या निर्णय यांपैकी एक निर्णय म्हणजे नव्या तीन संघांना आयसीसीचे सहयोगी सदस्य बनविले गेले. यामध्ये उझबेकिस्तान, कंबोडिया व कोट डी आयवरी या देशांचा समावेश आहे. आयसीसीने परवानगी दिलेला कंबोडिया २४ वा व उझबेकिस्तान २५ वा आशियाई देश बनला. तर कोट डी आयवरी २१ वा आफ्रिकन देश बनला जो आयसीसीशी संलग्न झाला आहे. यासोबत आता आयसीसी सहयोगी देशांची संख्या ९६ झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रेयस अय्यरबद्दल ‘ती’ कमेंट करणे न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूच्या अंगाशी, सारखा वाजतोय फोन!
‘त्यावेळी मी कारगिल युद्ध लढायला निघालेलो’, शोएब अख्तरने केले बेताल विधान