---Advertisement---

लक्ष्मणच्या नव्या कारकिर्दीला सुरुवात; फोटो शेअर करत म्हणाला, ‘भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी काम करण्यास उत्सुक’

VVS Laxman
---Advertisement---

भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या २ महिन्यांत अनेक बदल घडलेले दिसले. यातीलच एक मोठा बदल म्हणजे बंगळुरूमध्ये असलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (National Cricket Academy) प्रमुख बदलला. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) अध्यक्षपदी आता व्हीव्हीएस लक्ष्मण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ही जबाबदारी राहुल द्रविड सांभाळत होते. पण, द्रविडने भारताच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळल्याने ही जबाबदारी लक्ष्मणला देण्यात आली. याबद्दल आता लक्ष्मणने ट्वीट केले आहे.

माजी क्रिकेटर आणि भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने (VVS Laxman) एनसीए अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. त्याने ट्वीट करून याबद्दल माहिती दिली. कोलकातामध्ये झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लक्ष्मणसोबत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक असणारे ट्रॉय कूली (Troy Cooley) यांनी सुद्धा एनसीएच्या जलद गोलंदाजीच्या प्रशिक्षक पदासाठी संमती दिली.

लक्ष्मणने द्रविड्च्या जागी येऊन हे अध्यक्षपद स्वीकारलं आहे. त्याने एनसीएमध्ये काम करताना २ फोटोंसहित ट्वीटमध्ये लिहिलं, ‘एनसीएच्या कार्यालयातील पहिला दिवस. पुढे खूप काही आव्हानं आहेत. भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी काम करण्यास मी उत्सुक आहे.’

 

लक्ष्मणच्या या ट्वीट वर रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) त्याची फिरकी घेतली. त्याने ट्विट केले, ‘शहरात नवा वर्गशिक्षक आला आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.’

मागच्या महिन्यात युएईमध्ये झालेल्या टी२० विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर राहुल द्रविड यांनी मुख्य प्रशिक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला त्यामुळे एनसीएचं अध्यक्षपद रिक्त झालं होतं. आता या पदाची जबाबदारी लक्ष्मणने स्वीकारली आहे.

हे पद स्वीकारण्याआधी लक्ष्मण आयपीएल (IPL) मधील सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) मार्गदर्शक (Mentor) म्हणून काम करत होता. प्रशिक्षकपदाच्या अनुभवाबद्दल बोलाल, तर लक्ष्मण ६ वर्षे बंगाल क्रिकेट संघाचा (Bengal Cricket Team) फलंदाजी सल्लागार म्हणून काम करत होता. समालोचक म्हणून पण त्याची चांगली ओळख आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर! आता उपकर्णधारपदासाठी ‘हे’ आहेत ३ पर्याय

“प्रियांक पांचाळकडे स्वतःला सिद्ध करण्याची उत्तम संधी” रोहित संघाबाहेर झाल्यानंतर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

काळजाचा थरकाप उडवणारे ‘या’ दोनच कसोटी सुटल्या बरोबरीत; एकात भारतीय संघाचाही समावेश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---