रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये आपल्या खेळाने भारतीय जिम्नॅस्टिकला ओळख देणारी महिला जिमनॅस्ट दीपा कर्माकर सध्या उत्तेजक द्रव सेवन प्रकरणी बंदीचा सामना करत आहे. दीपाने रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या ती अगदी जवळ आली होती. मात्र, तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागलेले. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दीपावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
दीपावर 2021 च्या मध्यापासून बंदी घालण्यात आली आहे. वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सीच्या (वाडा) मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याने तिच्यावर ही कारवाई केल्याचे सांगितले जाते. तिच्या प्रशिक्षकांनी तिचा ठाव ठिकाणा कोठे होता याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. नियमानुसार प्रत्येकी तीन महिन्यानंतर ही माहिती संघटनेला देणे बंधनकारक असते. आहे.
भारतीय जिम्नॅस्टिक्स फेडरेशनचे अध्यक्ष सुधीर मित्तल, दीपा आणि तिचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांना या प्रकरणी वाडाने जाब विचारला होता. परंतु, त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही. तिघांनीही त्यांना पाठवलेल्या व्हॉट्सॲप मेसेजला उत्तर दिलेले नव्हते. त्याचवेळी, या प्रकरणी एफआयजीच्या मीडिया विभागाला एक मेल देखील पाठवण्यात आलेला. परंतु त्यांनी या प्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिलेला.
काय सांगतो नियम?
वाडाच्या नियमांनुसार, नोंदणीकृत चाचणी पूल (RTP) मध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूला त्याचा ठावठिकाणा संस्थेला कळवावा लागतो. जर खेळाडू वर्षातून तीन वेळा असे करू शकला नाही तर ते वाडाच्या नियमांचे उल्लंघन आहे. यासाठी खेळाडूला 12 ते 24 महिन्यांच्या बंदीला सामोरे जावे लागेल.
(WADA Ban Indian Gymnast Dipa Karmakar For Two Years)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पराभवानंतरही बांगलादेशी कर्णधार ऐटीतच! म्हणाला, ‘…तर सामन्याचा निकाल वेगळा असता’
सुनील गावसकरांवर कोसळला दुःखाचा डोंगर! जवळच्या व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास