---Advertisement---

पाकिस्तानच्या या खेळाडूने काढली भारताची खोड!

On: सोमवार, जुलै 1, 2019 8:17 PM
---Advertisement---

बर्मिंगहॅम। रविवारी(30 जून) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध इंग्लंड संघात 38 वा सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा 31 धावांनी पराभव केला आहे. भारताच्या या पराभवामुळे पाकिस्तान आणि बांगलादेश समोरील उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी अडचणीत वाढ झाली आहे.

त्यामुळे पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनुसने भारतीय संघाच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या सामन्यात जर भारताने विजय मिळवला असता तर पाकिस्तानचे या विश्वचषकातील उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची आशा उंचावल्या असत्या.

पण या सामन्यात भारतीय संघला इंग्लंडने दिलेल्या 338 धावांचा पाठलाग करताना 50 षटकात 5 बाद 306 धावाच करता आल्या. भारताचा हा या विश्वचषकातील पहिलाच पराभव आहे.

भारताच्या या पराभवानंतर वकार युनुस यांनी भारतीय संघाच्या खिलाडवृत्तीवर प्रश्नचिन्ह उभे करणारे ट्विट केले आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘तूम्ही कोण आहात हा मुद्दा नाही. तूम्ही जे आयुष्यात करता त्यावरु तूम्ही कोण आहात हे परिभाषित होते. मला पाकिस्तानचा संघ उपांत्यफेरीत जाईल की नाही त्याने फरक पडत नाही. पण एक गोष्ट नक्की काही चॅम्पियन्सची खिलाडूवृत्ती तपासली गेली आणि यात ते अनुउत्तीर्ण झाले.’

याआधी पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली आणि सिकंदर बख्त यांनीही भारतीय संघ मुद्दाम इंग्लंड विरुद्ध पराभूत होईल, ज्यामुळे या विश्वचषकातील उपांत्य फेरीत पोहण्यासाठी पाकिस्तान समोरील अडचणीत वाढ होईल, असे म्हटले होते.

सध्या या विश्वचषकात इंग्लंडचे भारताविरुद्धच्या विजयानंतर 10 गुण झाले आहेत. तसेच पाकिस्तानचे 9 गुण आहेत. त्यामुळे पातिस्तानला जर उपांत्यफेरीत प्रवेश करायचा असेल. तर न्यूझीलंड आणि इंग्लंड संघात होणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या विजयाची आशा करावी लागेल. त्याचबरोबर त्यांना बांगलादेश विरुद्ध विजय मिळवावा लागेल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

धोनीने इंग्लंड विरुद्ध वनडेमध्ये रचला इतिहास, युवराज सिंगलाही टाकले मागे

विजय शंकरच्या ऐवजी या खेळाडूची झाली टीम इंडियात निवड; बीसीसीआयने केली घोषणा

युजवेंद्र चहलने मोडला १६ वर्षांपूर्वीचा नकोसा असा विक्रम…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment