इंग्लंड क्रिकेट मंडळच्या ‘द हंड्रेड’ स्पर्धेच्या आयोजनाआधीच मोठा धक्का बसला आहे. या स्पर्धेतून ऑस्ट्रेलियन संघाच्या दोन मोठ्या खेळाडूंनी काढता पाय घेतला आहे. डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस स्टोयनिस हे या स्पर्धेच्या पहिल्या हंगामाचा भाग नसतील. या दोघांनी इंग्लंडमध्ये कोरोना काळातील तिथे असलेल्या सक्त नियमांमुळे द हंड्रेड लीगच्या पहिल्या मोसमात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
गुरुवारी वॉर्नर आणि स्टोयनिस स्पर्धेचा भाग नसतील अशी खबर आली, या दोघा खेळाडूंना साऊथन ब्रेव संघाने खरेदी केले होते. संघाने वॉर्नरसोबत 1 लाख यूरोचा करार केला होता तर स्टोयनिसला 80 हजार युरोमध्ये खरेदी केले होते. ऑस्ट्रेलिया संघाला पुढील महिन्यात वेस्टइंडिज आणि बांगलादेश दौऱ्यावर जायचे आहे आणि बायोबबलमध्ये जाण्याआधी खेळाडू आपल्या परिवारासोबत वेळ घालवू इच्छितात.
मागच्या वर्षीच या स्पर्धेची सुरवात होणार होती, परंतु या कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. आता या वर्षी पुढील महिन्यात या स्पर्धेच्या पहिल्या हंगामाला सुरवात होईल. ही स्पर्धा 21 जुलै ते 21 ऑगस्ट दरम्यान होईल. तसेच या स्पर्धेदरम्यानच ऑस्ट्रेलिया संघ बांगलादेश आणि वेस्टइंडिज दौरा करणार असून तिथे त्यांना मर्यादित षटकांचे सामने खेळायचे आहेत.
या स्पर्धेत महिला गटात भारताच्या हरमनप्रीत कौर, स्म्रीती मंधना, शेफाली वर्मा, दिप्ती शर्मा आणि जेमिमा रोड्रिग्ज या ५ खेळाडूही खेळणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
कॅचिंग प्रॅक्टिसची ही पद्धत तुम्हालाही करेल अचंबित, पाहा जबरदस्त व्हिडिओ
चक्क १० व्या क्रमांकावर फलंदाजीला सुरुवात करूनही भविष्यात ‘तो’ न्यूझीलंडचा स्टार सलामीवीर बनला