सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात खेळल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेत (ashes series) ऑस्ट्रेलियाने विजयी आघाडी घेतली आहे. ऍशेस मालिकेतील पहिले तिन्ही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. अशात ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर (david warner) याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यापूर्वी २०२३ ऍशेस मालिका जिकण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचसोबत भारतीय संघाला भारतात पराभूत करण्यासाठी देखील तो इच्छुक आहे.
२०२१ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्यांदा टी२० विश्वचषकाचे विजेतेपद जिंकले. ऑस्ट्रेलिया संघाला मिळालेल्या या विजयात ऑस्ट्रेलिया संघासाठी डेव्हिड वॉर्नरने महत्वाचे योगदान दिले. टी२० विश्वचषकातील त्याच्या कामगिरीसाठी वॉर्नरला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट निवडले गेले होते. वॉर्नरने ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना इंग्लंडमध्ये तीन आणि भारतात दोन कसोटी मालिका खेळल्या आहेत. या कसोटी मालिकांमध्ये त्याने काही खास प्रदर्शन केले नव्हते. इंग्लंड आणि भारतात खेळलेल्या कसोटी मालिकांमध्ये त्याने अनुक्रमे २६ आणि २४ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलिया संघाने अद्याप एकदाही भारतीय संघाला त्यांच्या मायदेशातील मालिकेत पराभूत केले नाही. याच पार्श्वभूमीवर वॉर्नरने त्यांच्या मायदेशातील मालिकेत भारताचा पराभव करण्याची इच्छा व्यक्ते केली. एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना वॉर्नर म्हणाला की, “आम्ही कधीच भारतीय संघाला भारतात हरवले नाही. आम्हाला ते करायचे आहे. २०१९ मध्ये इंग्लंडमधील मालिका अनिर्णीत राहिली होती. मात्र, आशा आहे पुढच्या वेळी आम्ही जिंकू.”
वॉर्नर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असला, तरी पुढच्या ऍशेस मालिकेपर्यंत त्याचे वय ३७ वर्ष होईल. असे असले तरी वॉर्नरला या गोष्टीचा काही फरक पडताना दिसत नाही. तो पुढे बोलताना म्हणाला की, “जेम्स अँडरसनने वयस्कर खेळाडूंसाठी एक आदर्श ठेवला आहे. मी माझ्याकडून धावा करण्याची कोणतीच संधी सोडू इच्छित नाही. मी फॉर्ममध्ये आहे. नवीन वर्षात एका मोठ्या खेळीची वाट पाहत आहे.”
तत्पूर्वी, बीसीसीआयच्या आयोजनात खेळल्या जाणाऱ्या आयपीएलचा २०२१ हंगाम वॉर्नरसाठी निराशाजनक ठरला होता. वॉर्नर यापूर्वी आयपीएल फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार होता. मात्र, आयपीएल २०२१ च्या मध्यात त्याच्याकडून संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले आणि केन विलियम्सनला नवीन कर्णधार बनवले गेले. एवढेच नव्हेतर, सनरायझर्स हैदराबादने स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यातील काही सामन्यात वॉर्नरला प्लेइंग इलेव्हनमध्ये देखील सामील केले नव्हते. परंतु संघाला या निर्णयाचा काहीच फायदा झाल्याचे दिसले नाही. सनरायझर्स हैदराबाद आयपीएल २०२१ च्या गुणतालिकेत सर्वात शेवटी होता.
महत्वाच्या बातम्या –
‘या’ कारणाने रद्द करण्यात आला आशिया चषकातील महत्त्वपूर्ण सामना; क्षणात बदलली उपांत्य फेरीची समीकरणे
‘ही’ आहे कसोटी क्रिकेटमधील २०२१ ची सर्वात फ्लॉप प्लेइंग Xi, जाणून घ्या कोणाला मिळाले कर्णधारपद
व्हिडिओ पाहा –