भारतीय क्रिकेट संघ हा नेहमी सरावावेळी फुटबॉल खेळताना दिसतो. मागील अनेक वर्षांपासून भारतीय संघात हा शिरस्ता पाळला जात आहे. त्याचवेळी सध्या भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून, दौऱ्याच्या सुरुवातीलाच पावसामुळे सामना होऊ शकला नाही. या कारणाने उभय संघातील खेळाडू इनडोअर स्टेडियममध्ये फुटबॉलचा आनंद घेताना दिसले. मात्र, भारताचा युवा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर हा बाजूला उभा राहिलेला दिसला. तू फुटबॉल का खेळत नाही याबाबत विचारले असता त्याने अतिशय चकित करणारे उत्तर दिले.
न्यूझीलंड व भारत यांच्या दरम्यान वेलिंग्टन येथे होणारा पहिला टी20 सामना पावसामुळे रद्द केला गेला. सामना सुरू होण्यासाठी विलंब होत असताना दोन्ही संघातील खेळाडू फुटबॉल आणि व्हॉलीबॉल या खेळांचे एकत्रीकरण करून एक वेगळाच खेळ खेळताना दिसले. मात्र, त्यावेळी सुंदर केवळ बाजूला उभा राहिला होता.
तू फुटबॉल का खेळत नाही असा प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला,
“मला फुटबॉल आधीपासून तितका आवडत नव्हताच. सहा वर्षांपूर्वी सरावावेळी फुटबॉल खेळताना मला दुखापत झाली. तेव्हापासून आजतागायत मी फुटबॉल खेळलो नाही. मला फुटबॉलशिवाय इतर गोष्टी करायला आवडतील.”
वॉशिंग्टन सुंदर हा मागील अनेक काळापासून भारतीय संघ बाहेर होता. याचे प्रमुख कारण त्याची दुखापत होती. वर्षभरापूर्वी त्याला दुखापत झालेली. त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये चांगला खेळ दाखवला. परंतु, आयपीएलनंतर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत तो पुन्हा दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर त्याने लॅंकेशायरसाठी काऊंटी क्रिकेट देखील खेळले. आता तो पुन्हा एकदा भारतीय संघात सामील झाला असून, संघातील जागा मजबूत करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
(Washington Sundar Not Playing Football Since Last 6 Years)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पदार्पणात फ्लॉप ठरलेल्या गिलच्या पाठीवर धोनीने ठेवलेला हात; स्वतः सांगितला तो किस्सा
चेन्नईने रिलीज केलेल्या खेळाडूने लावली शतकांची रांग, केली किंग कोहलीच्या ‘या’ विक्रमाची बरोबरी