भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने, ऑस्ट्रेलिया संघाला २- १ ने पराभूत केले होते. या मालिकेत भारतीय संघातील युवा खेळाडूंनी महत्वाची भूमिका बजावली होती. याच कामगिरीवर आनंदीत होऊन, आनंद महिंद्रा यांनी युवा खेळाडूंना थार एसयूव्ही देण्याचे ठरवले होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खेळाडूंना ही गाडी मिळण्यास सुरुवात झाली आहे. शार्दुल ठाकूर, टी नटराजन आणि मोहम्मद सिराजनंतर आता वॉशिंग्टन सुंदरला देखील ही गाडी भेट मिळाली आहे.
आनंद महिंद्रा यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना भेट देण्याचे ठरवले होते. यात शुबमन गिल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश होता. मंगळवारी (०६ एप्रिल) ही गाडी वॉशिंग्टन सुंदरला भेट म्हणून मिळाली आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर करत आनंद महिंद्रा यांचे आभार मानले आहे.
त्याने गाडी सोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले की, “या अद्भुत भेटवस्तू आणि प्रोत्साहनाबद्दल आनंद महिंद्रा यांचे मनापासून आभार. हे आम्हा तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. मला पूर्ण खात्री आहे की, तुमचे हेच समर्थन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि आपल्या देशाचा गौरव होईल. तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद सर.”
I have no doubt you will continue to explore the impossible… Thank you for being who you are.
— anand mahindra (@anandmahindra) April 7, 2021
वॉशिंग्टन सूंदर याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याने या संधीचे सोने करत भारतीय संघासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघासमोर विजयासाठी ३२८ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
या धावांचा पाठलाग करताना, सुंदरने पहिल्या डावात ६२ धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात २९ चेंडूत २२ धावांची ताबडतोड खेळी केली होती. यासोबतच रिषभ पंतसोबत मिळून त्याने ५३ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली होती आणि भारतीय संघाला सामन्यासह मालिकाही जिंकवून दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
टीका केली, तरीही गुरु तो गुरुच! पृथ्वी शॉने प्रशिक्षक पाँटिंगची केली ‘चक दे’मधील शाहरुख खानशी तुलना
सीएसके जरा जपून! पहिल्या लढतीत स्टिव्ह स्मिथ करणार ‘या’ क्रमांकावर फलंदाजी