भारत विरुद्ध न्यूझीलंड पुणे कसोटी सामना आता उद्या म्हणजेच (24 ऑक्टोबर) पासून खेळवले जाणार आहे. पहिला सामना गमावल्यानंतर टीम इंडिया बॅकफूटवर असली तरी मालिकेत अजून दोन सामने बाकी असल्याने काळजी करण्यासारखे काही नाही. तसेच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला अनेक संधी शिल्लक आहेत.
दरम्यान, टीम इंडियाचा स्टार खेळाडू दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करणार आहे. त्या खेळाडूचे पुनरागमन जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे, यासाठी रोहित शर्मानेही खास प्लॅन तयार केला आहे. आम्ही वॉशिंग्टन सुंदरबद्दल बोलत आहोत.
वॉशिंग्टन सुंदरने मार्च 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. हा सामना अहमदाबादमध्ये खेळला गेला. तेव्हापासून आजपर्यंत सुंदरने भारताकडून एकही कसोटी खेळलेली नाही. बीसीसीआयच्या निवड समितीने भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेसाठी संघ जाहीर केला, तेव्हाही वॉशिंग्टन सुंदरचे नाव त्यात नव्हते. पण पहिली कसोटी हरल्यानंतर अचानक सुंदरचे नाव संघात सामील झाले आहे.
बीसीसीआयच्या निवड समितीने जाहीर केलेल्या संघातून कोणीलाही बाहेर केले नाही. पण वॉशिंग्टन सुंदरचे नाव निश्चितपणे समावेश केले. आता सुंदर पुढचा सामना खेळताना दिसणार असल्याचं दिसत आहे. दरम्यान, पुण्याची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरू शकते. अशी माहिती मिळाली आहे.
बंगळुरूमध्ये पहिल्या डावात न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना खूप त्रास दिला होता. अवघ्या 46 धावा करून संपूर्ण संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. आता असे मानले जात आहे की या खेळपट्टीवर अशी उसळी नसेल. ज्यामुळे भारतीय फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकतील. जसजशी खेळपट्टी जुनी होईल तसतसे फिरकीपटू आपली प्रतिभा दाखवू शकतात.
वॉशिंग्टन सुंदरबद्दल बोलायचे झाले तर तो एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. तो केवळ गोलंदाजीतच चमत्कार करत नाही. तर फलंदाजीतही तो आपला हात दाखवण्यात यशस्वी आहे. सुंदरने आतापर्यंत चार कसोटी सामने खेळले असून, त्यामध्ये 265 धावा केल्या आहेत. तसेच त्याने तीन अर्धशतके झळकावली आहेत. नाबाद 96 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याची सरासरी 66.25 आहे आणि तो 52.78 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करतो. म्हणजेच एकंदरीत त्याची सरासरी केएल राहुलपेक्षा चांगली आहे. राहुल निव्वळ फलंदाज आहे.
हेही वाचा-
कुलदीप यादवची आयसीसी कसोटी क्रमवारीत झेप; बुमराह अव्वल स्थान राखून
IND VS NZ; पंत की जुरेल? दुसऱ्या कसोटी सामन्यात विकेटकीपिंग कोण करणार?
मेगा लिलावापूर्वी मोठा गेम होणार! दिल्ली कॅपिटल्स पंतला रिलिज करण्याची शक्यता, हे दोन संघ रिषभच्या मागे