भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West India) संघात १६ फेब्रुवारीपासून ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. या मालिकेतून भारताच्या टी२० संघाचा उपकर्णधार केएल राहुल आणि फिरकीपटू अक्षर पटेल बाहेर झाले होते. दोघेही दुखापतग्रस्त झाल्याने या मालिकेला मुकणार आहेत. यानंतर भारतीय संघाला अजून एक धक्का बसला असून यावेळी भारताचा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर हा संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या मालिकेला मुकण्यामागचे कारणही दुखापतच आहे.
बीसीसीआयने सोमवारी (१४ फेब्रुवारी) रात्री यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, शुक्रवारी (११ फेब्रुवारी) वेस्ट इंडिजविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करत असताना वॉशिंग्टन सुंदरचा डावा हॅमस्ट्रिंग स्नायू दुखावला गेला आहे. त्यामुळे तो आगामी ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत खेळू शकणार नाही. अशात वॉशिंग्टन सुंदरचा पर्यायी खेळाडू म्हणून फिरकीपटू कुलदीप यादवची निवड करण्यात आली आहे.
🚨 NEWS 🚨: Washington Sundar ruled out of @Paytm #INDvWI T20I series.
The #TeamIndia all-rounder suffered a left hamstring muscle strain during fielding in the third ODI against the West Indies played at the Narendra Modi Stadium on Friday.
More Details 🔽
— BCCI (@BCCI) February 14, 2022
राहुल आणि अक्षर दोघेही दुखापतग्रस्त झाल्याने त्यांच्याऐवजी ऋतुराज गायकवाड आणि दीपक हुडाचा संघात समावेश करण्यात आला आहे. हे दोघेही वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेचा भाग होते. याच वनडे मालिकेतून दीपकने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
वेस्ट इंडिज विरुद्धची टी२० मालिका कोलकातामधील इडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेतील सामने अनुक्रमे १६, १८ आणि २० फेब्रुवारी रोजी होतील.
असा आहे भारताचा टी२० संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (उपकर्णधार) (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, कुलदीप यादव
महत्त्वाच्या बातम्या-
Valentines Day Special : विदेशी मुलींना जीवनसाथी म्हणून निवडलेले ३ भारतीय क्रिकेटपटू
यूपी योद्धांपुढे दबंग दिल्लीची शरणागती, ४४-२८च्या मोठ्या फरकाने सामना खिशात
आठ कोटी खर्च करूनही आर्चर असेल अनुपलब्ध, तरीही मुंबईने का लावला दाव? नीता अंबानी म्हणाल्या…