भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर हा मागील एक वर्षापासून खराब फिटनेसमुळे संघाबाहेर आहे. त्याला काउंटी क्रिकेटमध्ये खेळताना खांद्याला दुखापत झाली होती. असे असले तरी तो सोशल मीडियावर चांगलाच ऍक्टीव्ह आहे. त्याने नुकताच एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. हा व्हिडिओ चाहत्यांना मोठ्या प्रमाणात आवडला असून त्यावर भन्नाट कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
वॉशिंग्टन सुंदर (Wasington Sundar)याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये त्याची आई त्याला मारताना दिसत आहे. झाले असे की, तो आपल्या फोनमध्ये पाहत होता की त्याचे लग्न कधी होईल. तेवढ्यात मध्येच त्याची आई येते आणि त्याला मारते. हा मजेशीर व्हिडिओ पोस्ट करताना त्याने कॅप्शनमध्ये ‘आई मला या विशेष दिवशी आशीर्वाद देत आहे. माझ्या जीवनाची कथा. #HappyBirthdayAmma’, असे दिले आहे. चाहत्यांना देखील वॉशिंग्टनचा हा व्हिडिओ भलताच आवडला आहे.
2021मध्ये अभ्यास सामन्यादरम्यान वॉशिंग्टनला मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याच्या गोलंदाजीवेळी बोटाची दुखापत झाली होती. त्याचा तो बोटही फ्रॅक्चर झाला होता. यामुळेच तो संघाबाहेर झाला. त्यानंतर तो कोरोनाच्या विळख्यात आला. ज्यामुळे तो आफ्रिका दौऱ्यासाठी मुकला. तर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे वेस्ट इंडिजच्या विरुद्धच्या टी20 मालिकेतही तो खेळला नाही. 2021 आयपीएलमध्येही तो सनरायजर्स हैदराबादकडून फक्त 6 सामने तर 2022मध्ये 9 सामने खेळला.
https://www.instagram.com/reel/CiNklj8APnb/?utm_source=ig_web_copy_link
वॉशिंग्टनने भारताकडून 2021मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या गाजलेल्या गाबा कसोटीमधून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. या सामन्यात त्याने पहिल्या डावात 4 विकेट्स आणि 84 धावा केल्या होत्या. यावेळी त्याने भारताच्या पहिल्या डावात सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 62 धावा केल्या होत्या. आतापर्यंत त्याने भारताकडून 39 सामन्यात 36 विकेट्स घेतल्या आहेत. ज्यामधील 25 विकेट टी20मध्ये घेतल्या आहेत. तसेच त्याने 39 सामन्यांमध्ये 369 धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आख्खं जग वाईट बोलत असताना मिर्झापूरमधल्या ‘बबलू भैया’ने केली कर्णधार रोहितची पाठराखण, शेअर केली खास पोस्ट
‘भविष्यात जोरदार पुनरागमन करू!’ राशिद खानने केलाय निर्धार
पीएसएलच्या ‘फ्लॉप शो’ नंतर पाकिस्तानचा आणखी एक ‘पीजे’, पीसीबीने केली मोठी घोषणा