विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत उतरेल. तत्पूर्वी, भारतीय संघाला दुखापतींनी ग्रासले आहे. आतापर्यंत दौऱ्यावर असलेले शुबमन गिल, आवेश खान व वॉशिंग्टन सुंदर हे तीन युवा खेळाडू दौऱ्यातून बाहेर पडले आहेत. मात्र, या दुखापतीमुळे भारतीय कर्णधार विराट कोहलीचे टेन्शन काही प्रमाणात वाढले आहे. कारण, आयपीएलमध्ये त्याच्या संघाचा प्रमुख खेळाडू खेळू शकणार नाही.
हा खेळाडू आयपीएलमधून बाहेर
इंग्लंड दौऱ्यावर असलेला युवा अष्टपैलू वाशिंग्टन सुंदर पहिल्या सराव सामन्यात बोटाच्या दुखापतीमुळे डोळ्यातून बाहेर झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तीन दिवसीय सामन्याच्या दुसऱ्या दिवशी तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर त्याच्या दुखापतीचे निरीक्षण केल्यानंतर आढळून आले की तो कसोटी मालिकेसाठी उपलब्ध नसेल. त्याला दौऱ्यावर येण्यापूर्वीच हा त्रास काही प्रमाणात असल्याचे समोर आले होते.
एका प्रमुख क्रीडा संकेतस्थळाच्या बातमीनुसार, वॉशिंग्टन सुंदर आगामी आयपीएल २०२१ च्या उर्वरित हंगामातून देखील बाहेर पडेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सुंदर याला ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी तंदुरुस्त राहू इच्छित आहे. त्यामुळे त्याआधी होणाऱ्या आयपीएलमध्ये तो खेळताना दिसण्याची शक्यता एकदम कमी असेल. विशेष म्हणजे सुंदर आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करतो.
एनसीएमध्ये होऊ शकतो सामील
वॉशिंग्टन सुंदर भारतात परतल्यानंतर बंगलोर स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) रिहॅबसाठी दाखल होऊ शकतो. सुंदर याला विश्वचषकासाठी भारतीय संघातील महत्त्वपूर्ण सदस्य मानले जात आहे. त्यामुळे, त्याची शस्त्रक्रिया ही कदाचित विश्वचषकानंतरच होईल. टी२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून युएई व ओमान येथे सुरु होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पुरुष बॉक्सिंगमध्ये भारताला धक्का! ब्रिटनच्या ल्यूककडून मनीषचा ४-१ ने पराभव
केव्हा, कुठे आणि कसा पाहाल श्रीलंका विरुद्ध भारत संघातील पहिला टी२० सामना? जाणून घ्या सर्वकाही