---Advertisement---

वेध आशिया चषक अन् टी२० विश्वचषकाचे! भारतीय दिग्गजाने निवडली संभावित टीम इंडिया, ‘या’ खेळाडूंना संधी

On: शनिवार, मे 21, 2022 10:37 AM
Team-India
---Advertisement---

या वर्षी क्रिकेट चाहत्यांनी टी२० क्रिकेटची चांगलीच मेजवानी मिळणार आहे. कारण यंदा टी२० विश्वचषकाबरोबरच आशिया चषकही खेळवण्यास येणार आहे. त्याचदृष्टीने इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगाम महत्त्वाचा समजला जात आहे. या हंगामात अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी करत आगामी स्पर्धांसाठी भारतीय संघाचे दार ठोठावले आहे. तसेच अनेक आजी-माजी दिग्गज खेळाडूंनी भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना संधी द्यायला हवी याबद्दल मतं मांडली आहेत. आता यात माजी भारतीय क्रिकेटपटू वासिम जाफर याचाही समावेश आहे.

जाफरने (Wasim Jaffer) त्याच्या मतानुसार आगामी आशिया चषक (Asia Cup) आणि टी२० विश्वचषकासाठी (T20 World Cup) संभावित भारतीय संघाची (Team India) निवड केली आहे. असे असले तरी या स्पर्धांसाठी खरा भारतीय संघ निवड समीती निवडेल.

क्रिकट्रॅकरने दिलेल्या वृत्तानुसार जाफर म्हणाला, टी२० विश्वचषकाच्या फ्रेममध्ये बसणार नाहीत, असे खेळाडू आशिया चषकात निवडकर्ते निवडणार नाही. त्यामुळे तुम्हाला दोन्ही स्पर्धांसाठी कोणत्याही बदलाशिवाय खेळाडूंना समर्थन द्यावे लागेल.

तसेच जाफरने निवडलेल्या संघात त्याने रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत यांच्यासह सूर्यकुमार यादवला संधी दिली आहे. त्याचबरोबर त्याने अष्टपैलू म्हणून हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा यांना अंतिम ११ जणांच्या संघासाठी पहिली पसंती दिली आहे. तसेच वेगवान गोलंदाज म्हणून हर्षल पटेल आणि भूवनेश्वर कुमार यांची निवड केली आहे. त्याचबरोबर तो म्हणाला की, मोहम्मद शमी आणि दीपक चाहर यांच्यात निवड करावी लागेल. पण त्याआधी चाहरने पूर्ण तंदुरुस्त होणे गरजेचे आहे.

यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान टी२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्याआधी ऑगस्टमध्ये आशिया चषक खेळवण्यात येऊ शकतो.

असा आहे वासिम जाफरचा आशिया चषक आणि टी२० विश्वचषकासाठीचा संभावित भारतीय संघ – 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषफ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, ऋतुराज गायकवाड, दिनेश कार्तिक/संजू सॅमसन, अक्षर पटेल/कुलदीप यादव, मोहम्मद शमी/दीपर चाहर.

राखीव खेळाडू – पृथ्वी शॉ, राहुल त्रिपाठी, टी नटराजन.

महत्त्वाच्या बातम्या – 

शेन वॉर्न त्याला ‘गोव्याची तोफ’ म्हणायचा, वाचा त्या स्वप्निल अस्नोडकरची संघर्षगाथा

मुंबई विरुद्धच्या सामन्यापूर्वी दिल्ली प्रशिक्षक पाँटिंगने भरली हुंकार, ‘आमच्या खेळाडूंवर पूर्ण विश्वास, ते…’

चेन्नई सुपर किंग्ज याच दिवशी ५ वर्षांपूर्वी खऱ्या अर्थाने मुंबई इंडियन्सच्या खूप मागे पडली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---