भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात रविवारी (०६ मार्च) कसोटी मालिकेतील पहिला सामना (Mohali Test) पार पडला. मोहालीच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर १ डाव आणि २२२ धावांनी विजय मिळवला. हा सामना जिंकत भारतीय संघाने २ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाच्या या मोठ्या विजयात अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याचे मोठे योगदान राहिले. त्याने या सामन्यात अष्टपैलू खेळ दाखवत सामनावीर पुरस्कारही जिंकला आहे.
भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा कुटणाऱ्या वसिम जाफर (Wasim Jaffer) याने मोहालीतील प्रदर्शनासाठी जडेजावर स्तुतिसुमने उधळली (Wasim Jaffer Praised Ravindra Jadeja) आहेत. परंतु त्याने एका गोष्टीवर मात्र खंत व्यक्त केली आहे. त्याचे असे म्हणणे आहे की, जडेजाने या सामन्यात अजून एक विकेट घेतली असती, तर सोने पे सुहागा झाले असते.
जडेजाचे मोहाली कसोटीत अष्टपैलू प्रदर्शन
जडेजाने श्रीलंकेविरुद्ध सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना नाबाद १७५ धावा केल्या. २२८ चेंडूंचा सामना करताना ३ षटकार आणि १७ चौकारांच्या मदतीने या धावा केल्या. जडेजाच्या या दीडशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेला ५७५ धावांचे भलेमोठे आव्हान दिले.
प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव सुरू असतानाही जडेजाने दमदार खेळ दाखवला. त्याने श्रीलंकेविरुद्ध संपूर्ण सामन्यात ८७ धावांवर ९ विकेट्स घेण्याची विलक्षण कामगिरी केली. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
हेही वाचा- मोहालीच्या मैदानावर नेहमीच खणखणीत वाजतं जडेजाचं नाणं, याच मैदानावर पूर्ण केलीय ‘अनोखी हॅट्रिक’
वसिम जाफरला एका गोष्टीबद्दल वाटली खंत
जडेजाने भलेही या सामन्यात शानदार प्रदर्शन केले असले तरीही त्याने अजून एक विकेट घ्यायला हवी होती (Wasim Jaffer Sad About Ravindra Jadeja), असे जाफरचे म्हणणे आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना जाफर म्हणाला की, “याला जडेजाची परिक्षाच म्हणायला पाहिजे. मी त्याच्यासाठी थोडा दु:खी आहे की, तो १० विकेट्स घेऊ शकला नाही. अन्यथा हा त्याच्यासाठी एक परफेक्ट कसोटी सामना असता. तसेही जडेजासाठी हा सामना शानदार राहिला आणि भारतीय संघही वास्तवात खूप चांगला खेळला.”
मोठ्या विक्रमापासून हुकला जडेजा
जाफरने म्हटल्याप्रमाणे जडेजाने १० विकेट्स घेतल्या असत्या, तर तो मोठा विश्वविक्रम करू शकला असता. जडेजाकडे एका कसोटीत १५० पेक्षा जास्त धावा करणारा आणि १० विकेट्स घेणारा जगातील पहिलाच खेळाडू बनण्याची संधी होती. परंतु केवळ एका विकेटमुळे तो या विश्वविक्रमापासून हुकला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मुलाखत घेताना मला खेळाडूंची भिती वाटायची, ते मला…’, स्पोर्ट्स अँकरचा क्रिकेटपटूंबद्दल मोठा खुलासा
महान फलंदाज गावसकरांनी शेन वॉर्नबद्दल केले वादग्रस्त वक्तव्य; भडकली ऑस्ट्रेलियन मीडिया