आज(१ ऑगस्ट) जगभरात मैत्री दिवस जोरदार साजरा केला जात आहे. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वच मित्र मैत्रीण एकत्र येऊन आपली मैत्री येणारे अनेक वर्ष अशीच राहो यासाठी शुभेच्छा देत असतात. अशातच भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर याने देखील माजी इंग्लिश कर्णधाराला मजेशीर ट्विट करत मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय संघाचा माजी फलंदाज वसीम जाफर हा सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टीव्ह असतो. तो आपल्या मजेशीर ट्विट ,खेळाडूंवर टीका आणि पायखेची करण्यासाठी ओळखला जातो. त्याचप्रमाणे मैत्री दिनाच्या दिवशी त्याने माजी इंग्लिश कर्णधार मायकल वॉन यांना मजेशीर ट्विट करत खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये हसायच्या ईमोजी टाकत ,”मैत्री दिनाच्या शुभेच्छा ” असं लिहिलं आहे. या ट्विटमध्ये त्याने मायकल वॉन यांना टॅग केले आहे.
हे दोघेही ट्विटर या माध्यमाद्वारे आपल्या प्रतिक्रीया देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. इंग्लंड संघ जेव्हा भारतीय दौऱ्यावर आला होता. त्यावेळी मायकल वॉन हे भरपूर चर्चेत होते. त्यांनी भारतीय खेळपट्टीवर वादग्रस्त टीका केली होती. तसेच नुकत्याच पार पडलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने विजय मिळवला होता. या सामन्यानंतर त्यांनी केन विलियमसनबद्दल आपली प्रतिक्रीया दिली होती. त्यांचे असे म्हणणे होते की, विलियमसन जर भारतीय असता, तर यावेळी तो जगभरातील सर्वोत्कृष्ट खेळाडू असता.(Wasim jaffer on Twitter sacastically wishes Michael Vaughan)
हे ट्विट वसीम जाफरला आवडले नव्हते. त्याने या ट्विटला प्रतिसाद देत ऋतिक रोशनचा फोटो शेअर केला होता. ज्यावर त्याने, “अतिरिक्त बोट ऋतिक रोशनला आहे, परंतु त्याचा जास्तीत जास्त वापर मायकल वॉन करतो.”
Happy friendship day @MichaelVaughan 😄 #FriendshipDay
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) August 1, 2021
एका मुलाखती दरम्यान मायकल वॉन यांना विचारण्यात आले होते की, कोणता असा खेळाडू आहे,ज्याला तुम्ही सोशल मीडियावर ब्लॉक कराल ? या प्रश्नाचे उत्तर देत, मायकल वॉन यांनी वसीम जाफरचे नाव घेतले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तू भारताची शान आहेस’, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून २ ऑलिंपिक पदकं जिंकणाऱ्या पीव्ही सिंधूचं कौतुक
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान ‘ही’ गोष्ट ठरेल महत्त्वाची, इंग्लिश क्रिकेटरनेच दिली प्रतिक्रिया