भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमनस याला भारतीय संघाकडून खेण्यासाठी अपेक्षित संधी मिळाल्या नाहीत, असे नेहमी बोलले जाते. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याने स्वतःची गुणवत्ता सर्वांना दाखवून दिली. भारतीय संघाचा माजी दिग्गज वसीम जाफर याच्यावर संजूच्या या खेळीचा चांगलाच प्रभाव पडला आहे. जाफरीने सॅमनसच्या कौतुकात खास प्रतिक्रिया देखील दिली आहे.
टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाने दक्षिण आप्रिकेविरुद्ध मायदेशात टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळली. या दोन्ही मालिका भारताने जिंकल्या असून संजू सॅमसन (Sanju Samson) एकदीवसीय मालिकेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला. त्याने एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 63 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 86 धावा केल्या, पण भारतीय संघ या सामन्यात 9 धावांनी पराभूत झाला. शेवटच्या षटकात संघाला 9 धावांची आवश्यकात होती, ज्यापैकी 19 धावा सॅमसनने केल्या. सॅमसन या सामन्यात शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिली, पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात त्याने अनुक्रमे 30 आणि 2 धावांची नाबाद खेळी केली, भारताच्या विजयासाठी नक्कीच महत्वाची होती.
सॅमसनच्या प्रदर्शनावर वसीम जाफर खुश
वसीम जाफर (Wasim Jaffer) सॅमसन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ज्या पद्धतीने खेळला, त्यामुळे चांगलाच प्रभावित झाला आहे. यष्टीरक्षक फलंदाजाचे कौतुक करत जाफर म्हणाला की, “संजू सॅमसनने नक्कीच मला खूप प्रभावित केले आहे. त्याच्या निरंतरतेवर नेहमीच प्रश्न उपस्थित होत असतात, पण या मालिकेत त्याने दाखवून दिले आहे की, तो नियमितपणे चांगले प्रदर्शन करू शकतो. तो भारताला पहिला सामना जरी जिंकवून देऊ शकला नसला, तरी त्यानंतरच्या दोन्ही सामन्यांमध्ये नाबाद राहिला आहे.” दरम्यान, भारतीय संघासोबत चमकदार कामगिरी केल्यानंतर सॅमसन सध्या केरळ संघासाठी सय्यर मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बड्डे आहे भावाचा! गंभीरच्या वाढदिवशी रैना म्हणाला, ‘तूच खरा मित्र’, तर युवराजनेही दिली ‘चॅम्पियन’ची उपमा
विराट आणि रोहितकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या! विश्वचषकापूर्वी नेट्समध्ये खेळले एकापेक्षा एक शॉट्स