दिनांक २० फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीला सुरवात होण्यापूर्वीच उत्तराखंडचे प्रशिक्षक वसीम जाफर यांनी राजीनामा दिला असल्याचे वृत्त समोर आले. संघानिवडीत हस्तक्षेप केल्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिला आहे हे यामागील मुख्य कारण असून उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनने त्यांचा हा राजीनामा देखील स्वीकारला.
वसीम जाफर यांनी उत्तराखंड क्रिकेट असोसिएनला पाठवलेल्या इमेल मध्ये लिहिले आहे की, ” मी खेळाडूंसाठी खरोखरच दुःखी आहे कारण मला वाटते की त्यांच्यात बरीच क्षमता आहे आणि ते माझ्याकडून बरेच काही शिकू शकतात, परंतु, योग्य खेळाडूंच्या निवडीसाठी निवड समिती आणि सचिव यांच्या हस्तक्षेपामुळे त्यांना ती संधी मिळत नाही”.
उत्तराखंड क्रिकेट असोसिएनचे सचिव माहीम वर्मा यांनी हे त्यांचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत त्यांचे म्हणणे आहे की, राज्य संघाचे प्रशिक्षक झाल्यानंतर वसीम जाफर यांना जे हवे ते सर्व दिले गेले, आम्ही त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या. त्याचप्रमाणे सत्राच्या एक महिना अगोदर आम्ही त्यांना बाहेरील खेळाडू, आवडीचे प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षकांची निवड करण्याची देखील संधी त्यांना दिली गेली, परंतु निवड प्रकरणात त्याचा हा हस्तक्षेप खूप जास्तच होत होता.
वसीम जाफर यांच्या प्रशिक्षणाअंतर्गत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी राष्ट्रीय टी- २० स्पर्धेत संघाच्या कामगिरीवर सीएयू खुश नसल्याचे दिसून येते. संघाचे प्रदर्शन फार खराब राहिलेले असून निवडकर्त्यांना आणखी खेळाडूंना आजमावून पहायचे होते, परंतु वसीम जाफर हे स्वतः निवडलेल्या संघावरच अधिक जोर देत राहिले जे योग्य नाही, असे वर्मा यांचे म्हणणे आहे.
वसीम जाफर यांना मागील वर्षी उत्तराखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली होती. परंतु एका वर्षाच्या आतच राजीनामा देताना सीएयूच्या सचिवांबद्दल त्यांनी सांगितले की, सचिवांना जर अशा प्रकारे काम करून वातावरण विकसित करायचे आहे ज्यात संघाच्या कल्याण आणि कामगिरीशी संबंधित काहीही निर्णय घेण्याची परवानगी मला नसेल तर मुख्य प्रशिक्षकपदावर मला राहायचा कोणताच अधिकार नाही, त्यामुळे मी माझा राजीनामा देत आहे. Wasim Jaffer Resigns As Uttarakhand Coach Due To Interference In Team Selection.
महा स्पोर्ट्सचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
रमेश पोवार मुंबईचे नवीन प्रशिक्षक
भारताचा माजी ऑफस्पिनर रमेश पोवारची विजय हजारे ट्रॉफी सामन्याच्या अगोदरच मुंबई संघाचा प्रशिक्षक म्हणून नेमणूक झाली. या अगोदर अमित पगनिस या संघाचा प्रशिक्षक होता ज्याने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खराब कामगिरी केल्यामुळे आपला राजीनामा दिला होता. त्यामुळे ही संधी पोवार याला दिली गेली.
महत्त्वाच्या बातम्या-
–पुन्हा मैदानात उतरणार सचिन, सेहवाग आणि लारासारखे दिग्गज; ‘या’ स्पर्धेत खेळताना दिसणार
–आयपीएल २०२१ : दोन कोटी आधारभूत किंमत असलेले हे तीन खेळाडू राहू शकतात लिलावात अनसोल्ड
–असे ३ खेळाडू जे भारताविरुद्ध खेळण्याआधी कोणाला माहितही नव्हते, पण भारताविरुद्धच्या सामन्यानंतर त्यांचे नशीब पालटले
–…ज्यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये ४५ मिनिटांत अवघ्या १५ धावांवर संपला होता एका संघाचा संपूर्ण डाव