टी20 विश्वचषक सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले असून, विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पाठीच्या स्ट्रेस फ्रॅक्चरच्या बातम्यांमुळे सध्या संघ व्यवस्थापनाची चिंता वाढलीये. बुमराहला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतून वगळण्यात आले असून, तो टी20 विश्वचषकातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्याचवेळी भारतीय संघाचा माजी क्रिकेटर वसीम जाफर याने बुमराहविषयी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
जसप्रीत बुमराह जुलै महिन्यातील इंग्लंड दौऱ्यानंतर कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळला नव्हता. तो पाठीच्या दुखापतीतून सावरत असल्याने संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांती दिली होती. टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सहभागी करून घेण्यात आले. तो मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना खेळला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत त्याचे खेळणे अपेक्षित होते. मात्र, पहिल्या सामन्यात त्याचे पाठीचे दुखणे पुन्हा एकदा उद्भवले. प्रथमदर्शनी तो पहिल्या सामन्यातून बाहेर झाला अशी माहिती देण्यात आली. परंतु, दुसऱ्या दिवशी त्याचे पाठीचे दुखणे गंभीर असल्याने तो संपूर्ण मालिकेत खेळणार नसल्याची माहिती बीसीसीआयने दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचे पाठीच्या स्ट्रेच फ्रॅक्चरचे दुखणे इतके गंभीर आहे की, तो आगामी विश्वचषकासाठी देखील उपलब्ध नसेल. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी, बुमराहची विश्वचषकात सहभागी होण्याची संधी गेल्याचे म्हटले जातेय. याच संपूर्ण प्रकरणावर बोलताना भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर याने एका क्रिकेट संकेतस्थळाला मुलाखत देताना म्हटले,
“मला वाटते की तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पूर्ण तंदुरुस्त होऊन आला नव्हता. त्याची दुखापत त्याच्यासोबतच होती. संघ व्यवस्थापनाने त्याचे पुनरागमन करण्यात घाई केली.”
बुमराह विश्वचषक संघातून बाहेर गेल्यास त्याच्या जागी मोहम्मद शमी अथवा दीपक चहर यांचा मुख्य संघात समावेश केला जाऊ शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
T20 Word Cup 2022: स्पर्धेच्या काही दिवसांआधीच भारत ब्रिसबेनमध्ये ठोकणार तळ! जाणून घ्या कारण
ब्रेकिंग! जसप्रीत बुमराहच्याजागी भारताच्या टी20 संघात ‘या’ वेगवान गोलंदाजाची एंट्री






