विराट कोहली (Virat Kohli) कर्णधार असलेला भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेसोबत कसोटी मालिका (South Africa vs India Test Series) खेळण्यास सज्ज झाला आहे. पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये खेळवण्यात येईल. हा सामना बॉक्सिंग डे सामना (Boxing Day Test) असणार आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेमध्ये मर्यादित षटकांची मालिका जिंकली आहे, पण भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकू शकला नाही.
याबद्दल माजी क्रिकेटर वसीम जाफर (Wasim Jaffer) यांनी दौऱ्याबद्दल वक्तव्य केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की भारतीय फलंदाजांसमोर आफ्रिकेच्या जलद गोलंदाजांचं आव्हान आहे. मागच्या दौऱ्यात कगिसो रबाडा (Kagiso Rabada) आफ्रिकेचा मुख्य गोलंदाज होता.
रबाडाने त्या मालिकेत १५ विकेट्स घेऊन यजमान आफ्रिका संघाला २-१ फरकाने मालिका जिंकायला मदत केली होती. जाफर म्हणाले की रबाडा यावेळीसुद्धा आक्रमक गोलंदाज होऊ शकतो आणि भारतीय फलंदाजांना त्याच्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे.
अधिक वाचा – क्रिकेट कारकिर्द धोक्यात असताना अश्विनसाठी देवासारखा धावून आलेला धोनी! दिलेला ‘कामाचा सल्ला’
दक्षिण आफ्रिका दौरा असणार आव्हानात्मक- वसीम जाफर
क्रिकेट नेक्स्टसोबत बोलताना वसीम जाफर म्हणाले, “दक्षिण आफ्रिकेकडे आक्रमक गोलंदाजांचा ताफा आहे, त्यात काही शंकाच नाही. तसेच मंगळवारी सीएसएने सांगितलं की एन्रिच नॉर्किया (Anrich Nortje) दुखापतग्रस्त असल्याने मालिकेत खेळणार नाही. तरीही आफ्रिकेकडे रबाडा आहे. त्याच्याकडे उत्तम कौशल्यं आहेत त्यामुळे भारतीय फलंदाजांना आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे. रबाडाची फलंदाजीसुद्धा आधीसारखी नाही राहिली. त्यामुळे भारतासाठी पूर्ण दौराच आव्हानात्मक आहे.”
व्हिडिओ पाहा : आख्खी कारकिर्द संपली, पण पठ्ठे कधीही शून्यावर बाद झाले नाहीत
ते पुढे म्हणाले, “भारतीय गोलंदाजांकडे आता अनुभव आहे. मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांच्याकडे खूप अनुभव आहे. माझ्या मते भारताने जर ४०० पेक्षा अधिक धावा केल्या, तर भारत तो सामना नक्कीच जिंकू शकेल. कारण विरोधी फलंदाजांसमोर तेव्हा धावा करण्याचं आव्हान असेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘या’ पंचरत्नावर असेल सर्वांची नजर
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड म्हणतेय, “जेव्हा वाटेल तेव्हा भारतात निघून जा…”; काय आहे कारण?