भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाचे ड्रायव्हर असलेले जेफ गुडविन यांचा एक खास व्हिडिओ बीसीसीआयने अधिकृत वेबसाइटवर शेअर केला आहे.
या व्हिडिओत सांगितले आहे की गुडविन हे 1999 च्या विश्वचषकापासून इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी जोडले गेले असून ते इंग्लंड दौऱ्यावर येणाऱ्या विविध संघासाठी बस ड्रायव्हर म्हणून काम करतात.
तसेच ते गुडविन यांनी त्यांचे काही अनुभवही सांगितले आहेत. त्यांनी भारतीय संघाला शिस्तप्रिय आणि सर्वात प्रोफेशनल संघ असल्याचे म्हटले आहे. तसेच ते म्हणाले मला भारत आणि आॅस्ट्रेलियाच्या संघाबरोबर प्रवास करायला आवडते.
याबरोबरच त्यांनी खेळाडूंच्या काही आठवणी सांगताना सांगितले की, सचिन तेंडूलकर त्यांच्या उजव्या बाजूला बसायचा. तसेच त्यांना आॅस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डॅरेन लेहमानने पॉपाय असे नाव दिले आहे. त्यामुळे त्यांनी पॉपाय या कार्टून कॅरेक्टरचा टॅट्यूही हातावर बनवून घेतला आहे.
गुडविन यांनी भारताचा टी20 स्पेशालिस्ट सुरेश रैनाबद्दलची न विसरता येण्यासारखी एक आठवणही सांगितली आहे. त्यांनी सांगितले की काही वर्षांपूर्वी त्यांची पत्नी आजारी असताना रैनाने त्याची जर्सी त्यांना मदत म्हणून लिलावासाठी दिली होती. हा क्षण ते कधीही विसरणार नाहीत असेही ते म्हणाले.
तसेच त्यांनी सांगितले की कॅप्टनकूल एमएस धोनी शानदार यष्टीरक्षक आहे. तसेच त्यांच्याबरोबर मस्ती करण्यासाठी भारताचा कर्णधार विराट कोहली पुढे बसतो.
या व्हिडिओत युजवेंद्र चहल गुडविन यांच्या मागे बसला आहे. त्याच्याबद्दल सांगताना ते म्हणाले हा मला ओल्डमॅन असे म्हणतो.
Say 👋 to Mr. Jeff Goodwin.#TeamIndia's bus driver gives interesting insights about various cricket teams who have been his passengers all these years. P.S Jeff loves this Indian Cricket team. Find out why…
▶️https://t.co/IQ2LWJK8Jn pic.twitter.com/aRVTbk2L5d
— BCCI (@BCCI) July 21, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–एमएस धोनी बाबतची बीसीसीयने सुधारली ही मोठी चूक
–टॉप 5: पाकिस्तान-झिम्बाब्वे यांच्यातील चौथ्या सामन्यात झाले हे खास विक्रम
–विराट कोहली, शिखर धवन कुटुंबासमवेत घेत आहेत सहलीचा आनंद