---Advertisement---

चक्क! ‘कॅप्टन कूल’ आपल्या संघसहकाऱ्यांना खाऊ घालतोय पाणी-पुरी; पहा व्हिडिओ…

On: गुरूवार, फेब्रुवारी 6, 2020 7:37 PM
---Advertisement---

क्रिकेट जगतात अनेक लहान-मोठ्या क्रिकेटपटूंचे मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशाच प्रकारे भारताला 2 विश्वचषक मिळवून देणारा भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा (MS Dhoni) एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत धोनी आपल्या माजी संघसहकारी आणि बीसीसीआय क्रिकेट सल्लागार समीतीचा सदस्य आर.पी. सिंग (R.P. Singh) आणि पीयूष चावलाला (Piyush Chawla) पाणी-पुरी खाऊ घालताना दिसत आहे.

ट्विटरवरील धोनीच्या फॅन अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये लिहिले आहे की, “थेट मालदीववरून. आमचा रॉकस्टार पाणी-पुरी बनवत आहे.”

या व्हिडिओवर चाहत्यांच्या अनेक कमेंट्स आल्या आहेत.

 

यापूर्वी धोनी मालदीवमध्ये आपल्या मित्रांबरोबर व्हॉलीबॉल खेळताना दिसला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.

मित्रांना पाणीपुरी खाऊ घालणाऱ्या व्हिडिओत धोनीने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसतोय. तसेच आपल्या मित्रांबरोबर समुद्र किनाऱ्यावर आरामात वेळ घालवताना दिसत आहे.

धोनी मागील वर्षीच्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. तसेच मागील महिन्यात बीसीसीआयने (BCCI) जाहीर केलेल्या वार्षिक मानधन यादीतून धोनीला वगळण्यात आले होते. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---