Smriti Mandhana Gifted Mobile To Special Fan :- शुक्रवारपासून (19 जुलै) महिला आशिया चषक 2024 चा श्रीगणेशा झाला आहे. श्रीलंकेत सुरू असलेल्या या स्पर्धेतील दुसरा सामना कट्टर प्रतिद्वंद्वी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर 7 विकेट्सने सहज विजय मिळवला. त्यानंतर संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना तिच्या एका छोट्या चाहतीला भेटली आणि तिला एक खास आणि संस्मरणीय भेट दिली. तिच्या या कृतीचे जगभरात कौतुक होत आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत एक्स खात्यावरून स्मृती मंधानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिची छोटी चाहती अदिशा हेराथला भेटताना दिसत आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी आदिशा मैदानावर आली होती, जिथे तिला स्मृतीला भेटण्याची संधी मिळाली आणि इतकंच नाही तर या भेटीदरम्यान स्मृतीने तिला एक फोनही भेट दिला. या सुंदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्मृती आपल्या छोट्या चाहतीला भेटल्यानंतर तिला खास भेटवस्तू देऊन तिचा दिवस कसा खास बनवते, हे पाहायला मिळत आहे.
Adeesha Herath’s love for cricket brought her to the stadium, despite all the challenges. The highlight of her day? A surprise encounter with her favorite cricketer, Smriti Mandhana, who handed her a mobile phone as a token of appreciation ????
???????????????????????????? ???????????????? ????????????????????… pic.twitter.com/iqgL2RNE9v
— Sri Lanka Cricket ???????? (@OfficialSLC) July 20, 2024
भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी आदिशा तिच्या आईसोबत मैदानावर आली होती. स्मृतीला भेटल्यानंतर अदिशाच्या आईने सांगितले की, “आम्ही टीम इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मंधानाला भेटलो आणि तिने माझ्या मुलीला फोन गिफ्ट केला. हे सर्व अचानक घडले. माझ्या मुलीला इतकी खास भेट मिळाली, ती खरोखरच खूप भाग्यवान आहे.” विशेष म्हणजे, आदिशाची आवडती महिला क्रिकेट दुसरी कोणी नसून स्मृती मंधानाच आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“मी यापेक्षा अधिक काय करू”, मोहम्मद शमीचा टीम मॅनेजमेंटला सवाल; विश्वचषकात मिळाली नव्हती संधी
प्रशिक्षक बनताच गंभीरने काढला धोनीवरचा राग? टीम इंडियातून सीएसकेचे चौघे ‘क्लिन बोल्ड’, सोशल मीडियावर चर्चा
बाबर आझमला जगावर वर्चस्व गाजवायचे? गुपचूप करतोय कोहलीला काॅपी, पाहा VIDEO






