भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (india tour of south africa) आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात आतापर्यंत गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (ajinkya rahane) दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (kagiso rabada) याचा शिकार झाला. परंतु अजिंक्यला बाद करार देताना मैदानावरील पंच संभ्रमात पडल्याचे पाहायला मिळाले.
दक्षिण अफ्रिकेचा पहिला डाव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आटोपला. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने त्यांच्या सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या आणि अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे दोघे खेळपट्टीवर कायम होते. सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही या दोघांनी चांगली खेळी केली. दुसऱ्या डावात अजिंक्य आणि पुजाराने १४४ चेंडूत १११ धावांची भागीदारी केली. परंतु ३५ व्या षटकात अजिंक्य रहाणे बाद झाल्यामुळे दोघांची भागीदारी तुटली.
या दोघांची भागीदारी तोडण्यास कारणीभूत ठरला दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा. रबाडाने दुसऱ्या डावाच्या ३५ व्या षटकात अजिंक्य रहाणेच्या रूपात त्याची पहिली विकेट मिळवली. परंतु अजिंक्यला बाद करार देताना पंच संभ्रमात पडल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अल्लाउद्दीन पालेकर हे मैदानावरील पंचाची भूमिका पार पाडत होते. रबाडाच्या षटकातील शेवटचा चेंडू रहाणेच्या बॅटला स्पर्श करून यष्टीरक्षक कायल व्हेरेनेच्या हातात गेला होता. त्यानेही तो झेल अगदी योग्यपणे पकडला.
चेंडूचा बॅटला झालेला स्पर्श खूपच नाजूक असल्यामुळे पंचांना सुरुवातीला त्याचा अंदाज आला नसावा, परंतु नंतर त्यांनी रहाणेला बाद घोषित केले. रबाडाने अपिल केल्यानंतर पंच पालेकरांना मान हलवत रहाणे नाबाद असल्याचे संकेत दिले होते, पण नंतर अवघ्या दोन सेकंदात त्यांनी स्वतःचा निर्णय बदलला आणि अजिंक्यला तंबूत परतावे लागले. पालेकरांकडून नाबादचे संकेत मिळाल्यानंतर राहणेही पुढचा चेंडू खेळण्याच्या तयारीत होता, परंतु शेवटी त्याला माघारी जावे लागले.
https://twitter.com/addicric/status/1478659100133056512?s=20
दरम्यान, भारतीय संघाने दुसऱ्या डावात ६०.१ षटकात २६६ धावा केल्या आणि संघ सर्वबाद झाला. पहिल्या डावात दक्षिण अफ्रिका संघ आघाडीवर असल्यामुळे शेवटच्या डावात विजयासाठी त्यांना २४० धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या डावात दक्षिण अफ्रिकेच्या लुंगी एन्गिडी, मार्को जान्सनने आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या, तसेच डुएन ओलिव्हियरने एक विकेट घेतली. भारतासाठी अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली.
महत्वाच्या बातम्या –
चांगल्या कामगिरीसाठी कसं केलं शार्दुलला तयार, प्रशिक्षक दिनेश लाड यांचा खुलासा
आधी खांद्यावरची धूळ झटकली, मग थेट अंगावर गेला; बुमराह-यान्सिनचे भर मैदानात कडाक्याचे भांडण
SAvsIND, 2nd Test, Live: भारताचे शेपूट वळवळले! दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २४० धावांचे आव्हान
व्हिडिओ पाहा –