fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पहा व्हिडिओ: कबड्डीपटू अजय ठाकूर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संवाद…

कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाउन सुरू आहे. कोरोना जनजागृतीच्या पार्श्वभूमीवर काल ३ एप्रिल २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशातील ४९ खेळाडूंसोबत चर्चा केली. या कॉन्फरन्समध्ये विविध खेळातील खेळाडू सहभागी झाले होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू हे होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळाडूंना कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी संकल्प, संयम, सकारात्मकता, सन्मान आणि सहयोग हे पाच मंत्र सांगितले. सर्व खेळाडूंनी देशात सकारात्मकता व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी जनजागृती करावी. सर्वांनी सोशल डिस्टसिंगचे पालन करावे. शिस्तीने मानसिकता चांगली ठेवून फीटनेसकडे कसे लक्ष देता येईल हे सांगावे.

या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये क्रिकेटपटू, हॉकीपटू, धावपटू आदी खेळाडूंबरोबर कबड्डीपटूंनीही सहभाग घेतला होता. कबड्डीपटू अजय ठाकूर व ममता पुजारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये सहभाग घेतला होता.

View this post on Instagram

मैं अजय ठाकुर धन्यवाद करता हूं हमारे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का जिन्होंने हमारा खेल प्रतियोगिता में भाग लेने वाले खिलाड़ियों का कुशल क्षेम जानने के लिए वीडियो कॉल के माध्यम से हमसे संपर्क किया। और हमे कोरोना जैसी महामारी पर अपने सुझाव सांझे करने का अवसर प्रदान किया ।मैं आप सभी से भी यही अनुरोध करता हु के आप भी अपने घर मे रहो और सरकार के द्वारा दिये गये निर्देशो का पालन करे ।

A post shared by AJAY THAKUR (@ajaythakurkabaddi) on

हिमाचल प्रदेश मध्ये पोलीस दलात कार्यरत असलेल्या अजय ठाकूरने पंतप्रधान नरेंद्र मोदींशी साधलेल्या संवादाची व्हिडिओ क्लिप आपल्या सोशल मिडिया अकाऊंवर पोस्ट केली आहे.

You might also like